Weekly Horoscope 13 To 19 July 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा नवा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा तिसरा तसेच नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमजीवनात आनंद आणि उत्साह वाढेल. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. अविवाहितांना चांगले स्थळ किंवा प्रेमाचा प्रस्ताव मिळू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नाते अधिक दृढ होईल.
करिअर (Career) – करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठ्या व्यवहारातून आर्थिक लाभ मिळू शकतो.
आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक स्थिती मजबूत राहील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात. खर्चापेक्षा बचतीवर अधिक भर द्या.
आरोग्य (Health) – आरोग्याच्या बाबतीत शारीरिक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे आरोग्य उत्तम राहील. मात्र अति कामाचा ताण घेऊ नका.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जोडीदारासोबत परस्पर विश्वास वाढेल. नात्यातील कटुता कमी होईल. विवाहितांना कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहितांना विवाहासाठी चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) – कन्या राशीच्या लोकांना कामातील शिस्त आणि नियोजनामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. नवीन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक स्थिती स्थिर राहील. बचत वाढवण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळा.
आरोग्य (Wealth) – तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर पाठदुखी, सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित चालणे, योग आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर ठरेल. संतुलित आहारावर भर द्या.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj