Welcome to the jungle box office collection Day14: अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the jungle) या सिनेमाला इतर नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची टक्कर असतानाही या कॉमेडी (Comedy Film) फिल्मने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. प्रदर्शित होताच अवघ्या काही दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला. 30 तगड्या कलाकारांची फौज असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ (Box Office collection) या सिनेमाच्या शर्यतीला ‘अल्फा’हा (Entertainment) चित्रपट होता. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचा सिनेमा रिलीज झाला. पण ‘वेलकम टू द जंगल’समोर ‘अल्फा’ची जादू काही चालली नाही. फॅमिली ऑडियन्सने थिएटरमध्ये जाऊन या सिनेमाचा मनसोक्त आनंद लुटला. रिलीजच्या 14 व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला? (Welcome to the jungle box office collection)
पहिल्या आठवड्यात ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला. पण त्यानंतर या सिनेमाच्या कमाई थोडी मंदावलेली असल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 120 कोटींचा टप्पा पार केला. यावरुन या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. या सिनेमाने 2 आठवड्यात जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 14 व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या सिनेमाने किती कोटी कमावले? जाणून घेऊयात.
फिल्मच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 93.15 कोटींचे कलेक्शन केले आहे. यानंतर 8 व्या दिवशी या सिनेमाने 4.50 कोटी, 9 व्या दिवशी 7.50 कोटी, तर 10 व्या दिवशी 9.75 कोटी कमावले. दरम्यान, 11 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. 11 व्या दिवशी या सिनेमाने 2.65 कोटी, 12व्या दिवशी 3 कोटी आणि 13 व्या दिवशी 2.35 कोटी कमावले.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने रिलीजच्या 14 व्या दिवशी 2.15 कोटी कमावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 14 दिवसांत या सिनेमाने 125.05 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 125 कोटी रुपयांमध्ये हा सिनेमा तयार झाला होता. 125 कोटी रुपये हे या सिनेमाचे बजेट होते. दरम्यान, 14 दिवसांत या सिनेमाने बजेट वसूल केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या: