Shravan 2026: सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार – नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..


Shravan 2026: शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो महिना अखेर अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलाय. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वांत पवित्र आणि पुण्यदायी महिन्यांपैकी एक मानला जातो. श्रावण हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवार (श्रावणी सोमवार) अत्यंत शुभ मानला जातो. अनेक भाविक या दिवशी उपवास करून शिवमंदिरात दर्शन घेतात. त्याच सोबत या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. तर श्रावणात मांसाहार, मद्यपान आणि तामसी अन्नाचा त्याग करून सात्त्विक आहार घेण्याची परंपरा देखील आहे. यंदा श्रावण महिना नेमका कधीपासून सुरू होतोय? यंदा श्रावणी सोमवार किती असतील? तिथी, सण, महत्त्व भाग्यशाली राशी जाणून घ्या..

श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय? (Shravan 2026)

श्रावण महिना हा केवळ व्रत-उपवासाचा काळ नसून आत्मशुद्धी, संयम, भक्ती आणि सेवाभाव वाढवण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात श्रद्धा आणि निष्ठेने भगवान शिवाची उपासना केल्यास मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. वैदिक पंचांगानुसार, 2026 मधील श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपेल. भगवान शिवाला समर्पित असलेला हा पवित्र महिना भक्ती, ध्यान आणि उपवासासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 

पहिल्याच श्रावणी सोमवाराला नागपंचमीचा दुर्मिळ योगायोग…

2026 वर्षात श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार असतील. या काळात भाविक या सोमवारी उपवास करू शकतात आणि भगवान शिवाची विशेष प्रार्थना करू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी नागपंचमीचा दुर्मिळ योगायोग जुळून येतोय..

पहिला सोमवार: 17 ऑगस्ट
दुसरा सोमवार: 24 ऑगस्ट
तिसरा सोमवार: 31 ऑगस्ट
चौथा सोमवार: 7 सप्टेंबर

श्रावण महिन्यात कोणत्या राशींसाठी ठरणार भाग्यशाली? (Lucky Zodiac Signs)

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 2026 मध्ये काही राशींना करिअर, आर्थिक प्रगती, वैवाहिक जीवन आणि व्यवसायात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या संक्रमणानुसार या राशी तुलनेने अधिक अनुकूल फळे अनुभवू शकतात.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभाचा ठरू शकतो. नोकरीत पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची चांगली साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मान-सन्मान वाढेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. गुंतवणुकीतूनही लाभ मिळू शकतो.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना करिअरमध्ये प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या व्यक्तींना व्यवसायात आणि नोकरीत अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि मानसिक समाधान लाभेल.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.

श्रावणातील प्रमुख सण

श्रावणी सोमवार
नागपंचमी
पुत्रदा एकादशी
रक्षाबंधन
नारळी पौर्णिमा
श्रावणी पौर्णिमा
गोकुळाष्टमी (काही पंचांगांनुसार भाद्रपदात)

श्रावणात केली जाणारी धार्मिक कार्ये…

  • भगवान शिवाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करणे.
  • बेलपत्र, पांढरी फुले, दूध, दही, मध आणि गंगाजल अर्पण करणे.
  • ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे.
  • श्रावणी सोमवारी उपवास करून शिवमंदिरात दर्शन घेणे.
  • गरजूंना अन्नदान आणि दानधर्म करणे.
  • शिवपुराण, रुद्राध्याय किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *