Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी


Ramesh Mhatre Dombivli: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उमटत आहेत. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांच्या हिंसक वागणुकीवरून काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘ज्या माणसाने एका महिलेवर हात उचलला, ज्यांची प्रतिमाच प्रत्येक ठिकाणी जाऊन मारामारी करण्याची आहे, अशा लोकांसोबत सभागृहात बसायला आम्हाला भीती वाटतेय अशी थेट आणि भीतीची भावना कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. (Dombivli Crime news)

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ चालवत आहेत आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचेच लोकप्रतिनिधी महिलांना बेदम मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत हीच का लाडक्या बहिणींची परतफेड? असा सवाल कांचन कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. हे कृत्य संपूर्ण सभागृहासाठी लाजिरवाणे असून, रमेश म्हात्रे यांचे महानगरपालिकेतून तात्काळ निलंबन करावे आणि विरोधी पक्षातील महिला सदस्यांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.

दरम्यान, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही डॉक्टर पुन्हा त्या रुग्णालयात काम करण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ज्या खाजगी एजन्सीकडून रुग्णालयात ते दोन डॉक्टर काम करत होते, त्या एजन्सीकडे तोंडी माहिती देत राजीनामे दिल्याची माहिती आहे. डॉ. वैभव साळुंखे यांनी डोंबिवली शहर सोडून आपल्या मूळ गावी अकोल्याला गेल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. वृष्टी बाविस्कर या सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर काम करण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्या पुन्हा कामावर रुजू होणार नसून त्यांनी सुद्धा राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंबाबत पोलीस मवाळ

शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना गुरुवारी प्रकृती बिघडल्यामुळे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून गुन्हा दाखल होऊन अटकेची कुणकुण लागताच रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. तसेच पोलिसांकडून रमेश म्हात्रे यांच्या सुनावणीला ऑनलाईन हजर राहण्याच्या मागणीलाही विरोध करण्यात आला नाही. या सगळ्यामुळे पोलीस खाते रमेश म्हात्रे यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

आणखी वाचा

KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *