Finance Horoscope 24 May 2026 In Marathi: हर्षण योगाच्या प्रभावामुळे मेष, कर्क, सिंहसह या राशींसाठी मान-सन्मान आणि कामात यश, तुळ, वृश्चिकसह या राशींनी आर्थिक नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मिथुन, कन्यासह या राशींचा खर्च वाढण्याचे संकेत आहेत. मेहनत, संयम, नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला ही यशाची सुत्रे आहेत. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते? मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत वेळ कशी असेल सविस्तरपणे पाहूया.

मेष आर्थिक राशिभविष्य – बदल सकारात्मक
मेषसाठी रविवार उत्तम असून फिरण्याचा योग आहेत. घरात जास्त वेळ देणार आहात. जे काही काम करणार आहात त्यात घरातील प्रत्येक सदस्य मदत करेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणातून आराम मिळेल. व्यवसायच प्रगती असून जे काही बदल केले तर सकारात्मक सिद्ध होतील.
वृषभ आर्थिक राशिभविष्य – खुषखबर मिळण्याचे योग
वृषभ राशीचा स्वामी शुक्र द्वितीय स्थानात आहे तसेच चंद्राचे सिंह राशीत संक्रमण सुरु आहे. तेव्हा रविवार म्हणजे मस्त रिलॅक्स असणार आहात. कामाच्या ठिकाणी शांतता आणि समाधान असून प्रोजेक्टदेखील पूर्ण होतील. खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची किंवा बातमीची वाट पाहत होतात ती मिळल्यामुळे आनंद वाढेल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य – अचानक खर्च वाढेल
मिथुन राशीचा स्वामी बुध द्वादश स्थानात तर चंद्र सिंह राशीत आहे. समस्येतून नक्की सुटका होईल. जे काम हाती घेणार त्यात यश आहे. मात्र अचानक खर्च वाढू शकतो त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना कायदेशीर गोष्टी आणि दस्तऐवज तपासून पहा. निरर्थक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका.
कर्क आर्थिक राशिभविष्य – प्रगतीचे योग, प्रतिष्ठेत वाढ
कर्क राशीसाठी रविवार उत्तम कारण द्वादश व्यय स्थानात मिथुन राशीतील गुरु तर द्वितीय स्थानातील चंद्र एकत्र आले आहेत. त्यामुळे यश, प्रतिष्ठा आणि प्रगती असेल. विरोधक काहीच करणार नाहीत. घरात वातावरण सकारात्मक असेल. संध्याकाळी काही भेटीगाठी होतील त्यामुळे ज्ञानात भर पडणार असून मस्त रिलॅक्स मूडमध्ये असाल.
सिंह आर्थिक राशिभविष्य – भाग्यवृद्धीचे योग
सिंह राशीचा स्वामी सूर्य वृषभ दशम स्थानात तर अष्टम चंद्र प्रथम स्थानात आहे. तेव्हा मान-सन्मान, संसारात सुख आणि भाग्यवृद्धीचे योग आहेत. नवीन गोष्टींच्या शोधात रुची घेणार असून काहीतरी नवीन करावे असे वाटेल. नातेवाईक किंवा मित्रांसोबत भेटीगाठी होतील. घरात मंगलकार्याच्या नियोजनाबद्दल चर्चा होईल.
कन्या आर्थिक राशिभविष्य – खर्चात वाढ, कामात यश
कन्या राशीसाठी रविवारी खर्चात वाढ आहे. व्यवसायातील योजना मात्र यशस्वी होतील. ग्रहस्थिती उत्तम असून कामात चांगले यश मिळेल. काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च केल्यामुळे तसेच तुमच्या सक्रिय सहभागामुळे मानसन्मान वाढेल. विरोधक काहीच करु शकणार नाहीत,तेव्हा बिनधास्त राहा.
तुळ आर्थिक राशिभविष्य – करिअरमध्ये प्रगतीचे योग
तुळ राशीच्या लोकांसाठी रविवार ठिक आहे. वेळेनुसार कामाचे नियोजन करा. ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग असून मेहनत करावी लागेल. व्यवसायात फोकस करत आहात पण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था असेल. ही परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य – व्यवसायात सल्ला महत्त्वाचा
वृश्चिक राशीसाठी रविवार ठीक आहे. ऑफिस आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडणार आहात. जे काम हाती घेणार ते व्यवस्थित पूर्ण करणार. नोकरीत प्रगती असून व्यवसाय वाढीसाठी सल्ला महत्त्वाचा आहे. एखादा मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. तेव्हा आधीत थोडे आर्थिक नियोजन करून ठेवा
धनू आर्थिक राशिभविष्य – खरेदी करताना बजेट पाहा
धनु राशीसाठी रविवार ठीक असून धनलाभाचा योग आहे. अपूर्ण कामे मार्गी लागतील, त्यामुळे रिलॅक्स फिल कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करणार आहात पण बजेटकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ऑफिसमध्ये तुमच्या सूचनांचे स्वागत असेल. सगळेजण तुम्हाला मदत करतील त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल
मकर आर्थिक राशिभविष्य – उधार देणे टाळावे
मकर राशीसाठी रविवार लाभदायक असून काही गुंतवणूक करण्याचा विचार करणार आहात. कामात नशिबाची चांगली साथ असेल. व्यवसायात तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल त्यामुळे समस्या कमी होतील. कोणी तुमच्याकडे उधार मागितले, तर देऊ नका, नाहीतर तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत. घरात वातावरण सुख समाधानाचे असून मानसन्मान वाढेल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य – कामात प्रगतीचे योग
कुंभ राशीचा स्वामी शनी उदयाला आला आहे. सिंह राशीतील सप्तम स्थानात चंद्र आहे. तेव्हा मुलांकडून खुषखबर मिळेल. प्रवासाचा योग आहे पण काही कारणाने प्रवास पुढे ढकलला जाईल. धनप्राप्तीचे योग असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. मदत मिळेल त्यामुळे समस्या पटापट मार्गी लागतील. तुमच्या कामाचा वेग, नम्रपणा यामुळे कामात प्रगतीचे योग आहेत.
