Last Updated:
विरोधी पक्ष महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत असताना सभागृहात कॅबिनेट मंत्री नसल्याचा आक्षेप भास्कर-जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी घेतला होता. यावर भातखळकर सरकारचा बचाव करण्यासाठी उठले असता त्यांनी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनाच बोल लावले. यानंतर सभागृहात पाच मिनिटे चांगलाच गदारोळ झाला.
मुंबई : वसई विरारच्या पूर स्थितीवरून सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडणारे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणात व्यत्यय आणणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर आमदार आदित्य ठाकरे चांगलेच संतापले. विरोधी पक्ष महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत असताना सभागृहात कॅबिनेट मंत्री नसल्याचा आक्षेप भास्कर-जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी घेतला होता. यावर भातखळकर सरकारचा बचाव करण्यासाठी उठले असता त्यांनी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनाच बोल लावले. त्यावर शिवसेनेचे दोन्ही नेते भातखळकर यांच्यावर चांगलेच संतापले. जवळपास पाच ते सात मिनिटे सभागृहात जोरदार गदारोळ झाला.
नेमकं काय घडलं?
वसई-विरारमधील पूरस्थितीच्या मुद्यावरून भास्कर जाधव यांनी सरकारच्या चुकांवर बोट ठेवले. मात्र सरकारमधील कुणीही मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचा आक्षेप भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी नोंदवला. त्यावर भातखळकर यांनी ठाकरे-भास्कर जाधवांना डिवचले. त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांनी भातखळकरांना पुढची पाच मिनिटे ऐकवले.
राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, तुमचं वय झालंय, खाली बसा
तुम्ही आम्हाला सांगू नका. राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. तुमचं वय झालंय, खाली बसा.. तुमचं वय बघून बोला… असे आदित्य ठाकरे अतुल भातखळकरांना उद्देशून म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांच्या देहबोलीत कमाचीचा आक्रमकपणा दिसत होता.
राम मंदिर लुटणाऱ्यानी आम्हाला सांगू नये असं म्हणत आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी भाजप आमदार अतुल भातखळकर आणि भाजपची इज्जत काढली😂 pic.twitter.com/lQ56Q8vrgs
— yogesh sawant (@yogi_9696) July 9, 2026
मनसेत पक्षप्रवेश करण्यासाठी गेले होते, तुम्ही आम्हाला कसली निष्ठा शिकवताय? भास्कर जाधवांचा पलटवार
मूळ मुद्द्यावर बोलण्याऐवजी भातखळकर भास्कर जाधव यांना निष्ठा शिकवण्यासाठी गेले. त्यावर तुम्ही आम्हाला कसली निष्ठा शिकवताय? तुम्ही राज ठाकरे यांच्याकडे मनसेत प्रवेश करण्यासाठी गेला होतात. त्यांनी नितीन गडकरी यांना फोन केला, त्यामुळे तुमचा पक्षप्रवेश झाला नाही, तुम्ही कसली निष्ठा शिकवताय? तुम्ही अजिबात काही सांगू नका. राम मंदिरात चोऱ्या करणारे तुम्ही. तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहेत. तुमचं ज्ञान, तुमची कुवत, तुमची झेप लोकांना माहिती आहे. फक्त तुम्हाला कळतं आणि बाकीच्यांना काही कळत नाही अशी तुमची वागण्याची पद्धत आहे. तुमच्या बोलण्यात कायम मलाच जास्त कळते, असा आविर्भाव असतो. तुमच्या मते दुसऱ्याला काहीच कळत नाही. हे बरे नव्हे… असे भास्कर जाधव यांनी भातखळकरांना सुनावले.
Mumbai,Maharashtra
