Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?


Guru Asta 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सध्याच्या ग्रहांच्या संक्रमणाच्या स्थितीनुसार, सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो. तेव्हा गुरूचा अस्त होतो. (साधारणतः 14 जुलै 2026 च्या मध्यापासून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत). विवाह, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारख्या शुभ कार्यांसाठी हा काळ वर्ज्य मानला जातो. दैनंदिन ज्योतिषीय मार्गदर्शनामध्ये किंवा कुंडलीचे विश्लेषण करताना, खालील राशींच्या लोकांसाठी हा काळ विशेष काळजी घेण्याचा ठरू शकतो. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope) 

या राशीसाठी गुरु अष्टम आणि लाभ स्थानाचा स्वामी आहे. गुरु अस्तामुळे आर्थिक व्यवहारात किंवा गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच, पोटाशी किंवा पचनाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

तूळ रास (Libra Horoscope) 

तूळ राशीसाठी गुरु तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. या काळात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत मतभेद किंवा अनावश्यक वाद होऊ शकतात. तसेच, घेतलेले कर्ज किंवा गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो.

मकर रास (Capricorn Horoscope) 

मकर राशीसाठी गुरु बाराव्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी आहे. अस्ताच्या काळात अचानक आणि अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. प्रवासात अडचणी किंवा भावंडांसोबतच्या संबंधांमध्ये ताणतणाव जाणवू शकतो.

धनु आणि मीन रास (Saggitarius and Pisces Horoscope) 

या दोन्ही राशींचा स्वामी स्वतः गुरु आहे. राशीस्वामी अस्तंगत असल्यामुळे या व्यक्तींच्या आत्मविश्वासात काहीशी कमतरता येऊ शकते. हाती घेतलेली कामे पूर्ण होण्यास विलंब लागू शकतो आणि महत्त्वाचे निर्णय घेताना संभ्रम निर्माण होऊ शकतो.

अशा काळात ग्रहांची शांती आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरते. या गुरु अस्ताच्या काळात नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी, पुष्कराजसारखी विशिष्ट रत्ने धारण करू शकता किवा गुरु शांति करणे म्हत्वाचे ठरते 

डॉ. भूषण ज्योतिर्विद

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                                                          

Guru Aditya Rajyog 2026 : गुरु-आदित्य राजयोगाने ‘या’ राशींचं उजळणार भाग्य; 16 जुलैपासून मागाल ती इच्छा होईल पूर्ण, धनसंपत्तीत मिळणार लाभ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *