Last Updated:
आता युरोप आणि ब्रिटनमधील लोकप्रिय ब्रँड आता भारतात आणखी स्वस्त मिळणार आहे. विशेष म्हणजे, कार, महागडी दारू या आता निम्म्या किंमतीत मिळणार आहे,
भारतात सध्या लक्झरी वस्तू, पदार्थ किंवा गाड्या खरेदी करायचं म्हटलं तर भलामोठा कर भरावा लागतो. समजा, एखादी कार जरी परदेशातून मागवली तर त्याच कारच्या किंमतीएवढा कर भरावा लागतो. पण, आता युरोप आणि ब्रिटनमधील लोकप्रिय ब्रँड आता भारतात आणखी स्वस्त मिळणार आहे. विशेष म्हणजे, कार, महागडी दारू या आता निम्म्या किंमतीत मिळणार आहे, .यासाठी आता फक्त ७ दिवस उरले आहे. याचं कारण म्हणजे, भारत आणि युनायडेड किंगडम (UK) मध्ये झालेला FTA करार.
मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) आता प्रत्यक्षात अमलात येण्याची वेळ जवळ आली आहे. हा मुक्त व्यापार करार 15 जुलैपासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. आता यासाठी पक्त ७ दिवस उरले आहे. मागील महिन्यात फ्रान्समध्ये जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर कराराची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता युरोपियन गाड्या, दारू आणि उद्योग जगतातील बऱ्याचं वस्तू आता भारतात स्वस्त होणार आहे.
व्हिस्की आणि जिन: खरं तर जिन आणि स्कॉच व्हिस्की ही आपल्याकडे प्रचंड महाग मिळते. पण, दोन्ही प्रकार हे परदेशातील आहे. पण आता UK मधून आयात होणारी स्कॉच व्हिस्की आणि जिनवर भारतात १५० टक्के कर होता तो आता फक्त ७५ टक्के आकारला जाणार आहे. त्यामुळे व्हिस्की आणि जिनची किंमत ४० टक्क्यांनी कमी होती. हा करार १० वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे आता एखादी स्कॉचची बाटली जी ५००० रुपयांना आहे ती आता 3500 रुपयांना मिळणार आहे.
UK मध्ये लोकप्रिय असलेल्या जगुआर लँड रोव्हर, रोल्स-रॉयस सारख्या कारही भारतात स्वस्त होणार आहे. टॅरिफ हा 100 टक्के होता तो आता 10 टक्के होणार आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत 20-30 टक्के कमी होतील,
UK मधून आयात होणारी सॅल्मन, लॅब, चॉकलेट, बिस्किट आणि सॉफ्ट ड्रिंक्सवर भलामोठा कर होता, तोही कमी होईल.
UK मध्ये कॉस्मेटिक्स, मेडिकल उपकरण आणि एयरोस्पेस पार्ट्स हे लोकप्रिय आहे. या करारामुळे ते आता भारतात 15 टक्के कमी होऊन फक्त 3 टक्के इतका असेल. त्यामुळे या वस्तू सुद्धा स्वस्त होतील.
एवढंच नाहीतर ब्रिटेनमध्ये मिळणारे ब्रँडेड कपड़े, फॅशन प्रोडक्ट्स आणि गृहउपयोगी वस्तू या आता भारतीयांना वापरता येतील. एवढंच नाहीतर फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहे.
हा करार 24 जुलै 2025 मध्ये झाला होता. पण, हा करार लागू होण्यासाठी तब्बल एक वर्ष लागलं. कारण, भारत सरकारचं केंद्रीय कॅबिनेट आणि UK च्या संसदेकडून मंजुरी गरजेची होती. भारत सरकारने मंजुरी दिल्यानंतर युके संसदेनंही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या करारामुळे भारतात वस्तू तर स्वस्त होतील आणि रोजगाराच्या संधीही वाढणार आहे.
Jul 08, 2026 10:34 PM IST
उरले फक्त 7 दिवस! आता भारतात परदेशी व्हिस्की, जिन होणार स्वस्त, Audi आणि BMW च्या गाड्याही येतील बजेटमध्ये!
