नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये केलं हनीमून, CTI सस्पेंड, जालन्याचा डेकोरेटर अडकला, रेल्वेचे सजावटीचे नियम काय? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

ट्रेनच्या एसी फर्स्ट क्लासचा बर्थ हनीमूनसाठी सजवल्याचा व्हिडिओ समोर आला होता, याप्रकरणी रेल्वेने मोठी कारवाई केली आहे.

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये केलं हनीमून, CTI सस्पेंड, जालन्याचा डेकोरेटर अडकला, रेल्वेचे सजावटीचे नियम काय?
नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये केलं हनीमून, CTI सस्पेंड, जालन्याचा डेकोरेटर अडकला, रेल्वेचे सजावटीचे नियम काय?

मुंबई : ट्रेनच्या एसी फर्स्ट क्लासचा बर्थ हनीमूनसाठी सजवल्याचा व्हिडिओ समोर आला होता, याप्रकरणी रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. रेल्वेच्या तपासामध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चीफ टिकिटिंग इन्सपेक्टर (सीटीआय) गिरीश कुमार, नांदेड याला निलंबित करण्यात आलं आहे. याचसोबत रेल्वेने पुढच्या तपासाचे आदेशही दिले आहेत. रेल्वे कोचमधला बर्थ फुलं आणि फुग्यांनी हनीमूनसाठी सजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर रेल्वेने ही कारवाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रकार ट्रेन क्रमांक 11002 बल्लारशाह-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीमध्ये बर्थ क्रमांक 19 आणि 20 मध्ये घडला. नवविवाहीत जोडपं शुभम आणि सोनाली यांनी बर्थ फुलं आणि फुग्यांनी सजवला होता. हे डेकोरेशन जालन्यामधल्या एका डेकोरेटरने ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर केलं होतं. जालन्यामधील राहत डेकोरेटरने नंदीग्राम एक्स्प्रेसच्या एसी फर्स्ट क्लासचा बर्थ हनीमूनसाठी सजवल्याची माहिती समोर आली आहे.

जालन्याचा डेकोरेटर

डेकोरेटर जालना स्टेशनमध्ये फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये चढला आणि त्याने बर्थची सजावट केली, पण यासाठी त्याने रेल्वेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याप्रकरणामध्ये सुरक्षेची गंभीर चूक झाली आहे, कारण कोणत्याही परवानगीशिवाय बाहेरची व्यक्ती आरक्षित एसी कोचमध्ये एन्ट्री करू शकत नाही, हे सुरक्षा नियमांचं उल्लंघन आहे, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

कोणतीही व्यक्ती किंवा डेकोरेटर अधिकृत परवानगीशिवाय कोचमध्ये प्रवेश करून सजावट करू शकत नाही. जर एखाद्या खास कार्यक्रमासाठी डेकोरेशन करायचं असेल, तर यासाठी रेल्वेचे नियम पाळावे लागतात आणि पूर्व परवानगी आवश्यक असते, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रेल्वेने याप्रकरणी तपासणी केल्यानंतर ड्युटीवर असलेले सीटीआय गिरीश कुमार यांना बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल निलंबित केलं आहे. डेकोरेटरला कोचमध्ये प्रवेश कसा मिळाला? याचा तपास रेल्वे करत आहे. तसंच यामध्ये आणखी कुणा कर्मचाऱ्याचा हात असेल, तर त्याच्यावरही कारवाई होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये केलं हनीमून, CTI सस्पेंड, जालन्याचा डेकोरेटर अडकला, रेल्वेचे सजावटीचे नियम काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *