Last Updated:
सचिन आणि राहुल द्रविडनंतर आता आणखी एका दिग्गज खेळाडूचा मुलगा अंडर-19 क्रिकेट गाजवत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युथ टेस्ट सीरिजसाठी स्टार खेळाडूच्या मुलाची निवड झाली आहे.
मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची फार संधी मिळाली नाही, पण लखनऊकडून अर्जुनला जी संधी मिळाली त्याच त्याने सोनं केलं. सचिनच्या मुलानंतर आता राहुल द्रविडचा मुलगाही अंडर-19 क्रिकेट गाजवत आहे. श्रीलंका अंडर-19 टीमविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याने झुंजार अर्धशतक केलं. सचिन आणि राहुल द्रविडनंतर आता आणखी एका दिग्गज खेळाडूचा मुलगा अंडर-19 क्रिकेट गाजवत आहे.
इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर एन्ड्रयू फ्लिन्टॉफचा मुलगा रॉकी फ्लिन्टॉफ त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये चर्चेत आला आहे. रॉकीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युथ टेस्ट सीरिजसाठी इंग्लंडच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली आहे.
रॉकीच्या करिअरची धमाकेदार सुरूवात
राईटी बॅटर असलेल्या रॉकीने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी आणि 8 लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. याशिवाय तो इंग्लंड लायन्स आणि लँकशायरच्या सेकंड इलेव्हन टीमचाही भाग होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये रॉकीची कामगिरी उत्कृष्ट झाली. त्याने 29, नाबाद 79 आणि 55 रनची खेळी केली. तसंच तो इंग्लंड लायन्सकडून शतक ठोकणारा सगळ्यात युवा खेळाडूही आहे.
रॉकी फ्लिन्टॉफ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 81.5 च्या सरासरीने एकूण 163 रन केले, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. पुढच्या सीरिजमध्ये रॉकी मैदानात उतरला तर लागोपाठ तिसऱ्या मोसमात तो यूथ टेस्ट सीरिजचा भाग असेल. याआधी त्याने 2025 मध्ये भारताविरुद्ध 93 रनची खेळी केली होती, त्याआधीच्या मोसमात रॉकीने श्रीलंकेविरुद्ध 106 रन केले.
रॉल्फी अल्बर्टला कॅप्टन्सी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युथ टेस्ट सीरिजसाठी इंग्लंडने 15 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे, ज्याची कॅप्टन्सी सरेच्या रॉल्फी अल्बर्टला देण्यात आली आहे. अल्बर्टच्याच नेतृत्वात इंग्लंडने वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला. सोमवारी झालेल्या शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 76 रननी विजय मिळवला. यानंतर आता पुढच्या आठवड्यापासून युथ टेस्टला सुरूवात होणार आहे.
इंग्लंडची अंडर-19 टीम
रॉल्फी अल्बर्ट (कर्णधार), विल बेनसिन, जेकब ब्लेड्स, रॉबी बोमन, बेन डॉकिन्स, कालेब फाल्कनर, अली फारूक, रॉकी फ्लिन्टॉफ, एलेक्स फ्रेंच, चार्ली हारमिनसन, मॅनी लुम्सडेन, जेम्स मिंटो, जॅक नेल्सन, ब्रॅडली सिल्वेस्टर, चार्ली टेलर
Mumbai,Maharashtra
Jul 08, 2026 11:50 PM IST
