Last Updated:
पनवेल तालुक्यातील मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका एचपीसीएलच्या गॅस सिलेंडर गोदामालाही बसला
पनवेल : राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. पण, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात जोरदार पाऊस सुरू आाहे. अशातच पनवेलमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमातल्या सीनसारखी घटना पाहण्यास मिळाली. पावसामुळे एका सिलेंडरच्या गोदामाला तडाखा बसला. त्यामुळे थोडे थोडके नाही तर तब्बल ३००० सिलेंडर पाण्याात वाहून गेले. लाल सिलेंडर पाण्यात पाहून लोकांना पुष्पा सिनेमातला सीन आठवला. पण, आता एचपी कंपनीची मात्र, पंचाईत झाली आहे. जे सिलेंडर सापडले ते आणून द्यावे, असं आवाहन करावं लागलं आहे.
पनवेल तालुक्यातील मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका एचपीसीएलच्या गॅस सिलेंडर गोदामालाही बसला. पुराच्या पाण्यात गोदामातील हजारो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पुढे जाऊन हे सिलेंडर खारपाडा पुलावावरून वाहत जाताना दिसून आली.
पनवेल तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीमध्ये आलेल्या पुराचा फटका गॅस सिलेंडर गोदामालाही बसला, हजारो सिलेंडर गेले वाहून pic.twitter.com/yrUrwNQkdG
— News18 Marathi (@News18_marathi) July 8, 2026
सततच्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. नदीचे पाणी एचपीसीएलच्या सिलेंडर साठवणूक गोदामात शिरल्याने तेथील मोठ्या प्रमाणावरील घरगुती गॅस सिलेंडर पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून वाहून गेलेल्या सिलेंडरचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लॉट मधून पाताळगंगा यामधून परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 3000 सिलेंडर यामध्ये काही गॅस भरलेले आहे आणि काही रिकामे गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर पाताळगंगा नदीमध्ये वाहून गेले आहे. हे गॅस सिलेंडर ज्या नागरिकांना सापडले असतील त्यांनी तात्काळ एचपीसीएल कंपनीकडे अथवा जवळच्या एचपीसीएल डिलरकडे, तहसिलदार कार्यालय, खालापूर, पेण तहसिलदार कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांचे कार्यालयास जमा करावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, चावणे येथील HPCl येथील प्लँट मधून पुराच्या पाण्यात अंदाजे 3000 सिलेंडर वाहून गेले असून त्यातील 1000 हजार सिलेंडर रिकव्हर केल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.आणि उर्वरित सिलेंडर रिकव्हर करण्याची कारवाही सुरू असल्याची माहिती पाठक यांनी news 18 मराठी शी बोलताना दिली.
Panvel,Raigad,Maharashtra
