देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही


मुंबई : राज्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईपुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरही (Missing link) दरड कोसळल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून विरोधकांनी, नेटीझन्सने सत्ताधारी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत बोलताना विरोधकांवर जोरदार पलटवार केला. तसेच, एक कोटी खोटारडे मेल्यानंतर हे लोक पैदा झाले आहेत, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. तसेच, माझी बदनाम करा पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, अशा इशाराही मुख्यमंत्र्‍यांनी दिला. त्यावरुन, विरोधकांनी पलटवार केला असून तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटलं.  

मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहातून दिलेल्या इशाऱ्यानंतर विरोधकांनी देवेद्र फडणवीस यांच्यावर पटलवार केला. मुख्यमंत्र्यांचे आपल्यावर खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही असं कोण म्हटलं होतं? काल नाशिकमध्ये ढगफुटी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र, ढगफुटी पाऊस झाला नाही, याचा अर्थ खोट कोण बोलतं, यावरुन लक्षात येते, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला. 

भास्कर जाधव यांनीही फडणवीसांना उत्तर दिले.  एकेकाळी तुम्ही देखील विरोधी पक्षनेते होता, तेव्हा तुम्ही किती आरोप करत होता. कोव्हिड काळात तुम्ही उद्धव ठाकरेंवर किती आरोप केले?  सकाळी आशिष शेलार, 11 वाजता लाड-दरेकर, दुपारी 2 वाजता चंद्रकांत दादा, दुपारी 4 वाजता देवेंद्र फडणवीस स्वत: पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा तुम्ही बेछूट करत असलेले आरोप दिसले नाही का? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.  

पहाटेच्या शपथविधी महाराष्ट्राचा सन्मान वाढवला का? – अंधारे

मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहाच्या पटलावर कुत्ते, भाडे के टट्टू आणि तत्सम अतिशय सभ्य आणि संसदीय शब्दांमध्ये मोठमोठ्याने दरडावून सांगितले की, महाराष्ट्राची बदनामी करू नका. पहाटेचा शपथविधी किंवा ज्यांना चक्की पिसायला लागेल म्हणाले आणि ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना मांडीला मांडी लावून बसवून घेणारे कोण होते आणि त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान केला की सन्मान वाढवला हे त्याच सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड सांगण्याचे कष्ट मुख्यमंत्री महोदय घेतील का?, असा सवाल शिवसेना उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी विचारला. 

अजित पवारांचा विसर पडला – मिटकरी

देवेंद्र फडणवीसजी, मिसिंग लिंक ( कनेक्टिंग लिंक) वर तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांना आज सभागृहात ऑन रेकॉर्ड सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केल्याबद्दल प्रथमत: आपले मनापासून आभार. मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यामध्ये आपले व एकनाथ शिंदे यांचे योगदान जसे नाकारता येऊ शकत नाही तसेच आपल्या खांद्याला खांदा लाऊन युती सरकारमध्ये प्रामाणिक पणे या मिसिंग लिंक प्रकल्प उभारणीत काम करणाऱ्या अजितदादांना नाकारून चालणार नाही. आपण इतक्या लवकर दादांना कसे विसरू शकता? त्यांच यात काहीच योगदान नव्हत का ? आज सभागृहात दादांचे स्मरण झाले असते तर आम्ही कायम आपल्या चरणावर नतमस्तक झालो असतो. मात्र तसे झाले नाही, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी सभागृहात अजित पवारांचा उल्लेख न झाल्याने नाराजी व्यक्त केली. 

मिसिंग लिंकला अजित पवारांचे नाव द्या

तुम्ही आदरणीय दादांना मित्र मानत होता ना, मग असा विसर कसा पडला? आज सभागृहात आपण दादांना विसरलात ही वेदना महाराष्ट्राच्या मनात खोलवर घाव करून गेली आहे . आपल्याला एक विनंती या मिसिंग लिंकला अजित दादांचे नाव देऊन दादांशी असलेली मैत्री स्मरणात ठेवत झालेली चुक दुरुस्त करावी अर्थात मिसिंग लिंक मधून मिस झालेल्या अजितदादाचे नाव कायम स्मरणात ठेवावे, असा सल्ला देखील मिटकरींनी दिला आहे.

हेही वाचा

पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *