एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी ईराणसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषण केली. तर दुसरीकडे जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात दिवसभरात दुसऱ्यांदा मोठी घसरण झाली आहे.
आज दिवसभरात सोन्याच्या दरात 3 हजार रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजारांची घसरण झाली आहे. खरं तर ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे.
8 जुलै रोजी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 775 रुपयांवर पोहोचले आहेत. सकाळी हेच दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपये होते.
तर दुसरीकडे सकाळी एक किलो चांदीचे दर 2 लाख 36 हजार 900 रुपये होते. ते दर आता चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपये झाले आहेत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




