India vs England 3rd T20: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा (Ind vs ENG) दारुण पराभव झाला. इंग्लंडने 125 धावांनी सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावासामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. दरम्यान, भारताच्या या पराभवानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. (India vs England T20)
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यातून संजू सॅमसनला वगळण्यात आले होते. संजू सॅमसनच्या जागी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर टीम इंडियाच्या चाहत्यांनी संजूच्या नावाच्या घोषणा केल्या. सामना संपल्यानंतर जेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बाहेर आला, त्यावेळी चाहत्यांनी ‘We want Sanju’ अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या. यावेळी टीम इंडियाचे इतर खेळाडू देखील होते. सदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर आणि तिलक वर्मा मैदानातून बसमध्ये जात असताना चाहत्यांकडून ‘We want Sanju’ च्या घोषणा दिली जात आहे.
‘We want Sanju’ chants outside the stadium when team India leaves. pic.twitter.com/bzqljBakTG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2026
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा पराभवाचा सिलसिला कायम- (Shreyas Iyer Gautam Gambhir)
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला. ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 76 धावात सर्वबाद झाला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) पराभवाचा सिलसिला आता पाच सामन्यांपर्यंत पोहोचला आहे. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 70 धावा केल्या, तर सॅम करन 41 धावांवर नाबाद राहिला. भारताने अवघ्या पाच षटकांत 52 धावांत पाच विकेट्स गमावल्या. भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारले आणि विजयाचे लक्ष्य गाठण्याचा कोणताही ठोस प्रयत्न केला नाही. इंग्लंडने हा सामना 125 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
पराभवानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला? (India vs England 3rd T20)
सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, ही अत्यंत खराब आणि निराशाजनक कामगिरी होती. इतक्या मोठ्या फरकाने सामना हरणे अजिबात स्वीकारार्ह नाही. सर्वात आधी, आपण हा पराभव स्वीकारला पाहिजे आणि आपली रणनीती नव्याने आखली पाहिजे. मला नाही वाटत की ही 200 धावांची खेळपट्टी होती, पण आमच्या चुकांमुळे आम्हाला हा सामना गमवावा लागला, असं श्रेयस अय्यर म्हणाला. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या खराब फलंदाजीला या पराभवाचे मुख्य कारण मानले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्येच चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या, ज्यामुळे संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. संघाच्या त्रुटींवर प्रकाश टाकताना अय्यरने नमूद केले की, खेळाडू मैदानावर योजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आणि त्यांना खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेता आले नाही. आम्ही पॉवरप्लेमध्ये चार विकेट्स गमावल्या, ज्यामुळे आम्ही सामन्यात खूप मागे पडलो. सामन्यापूर्वीची तुमची रणनीती कितीही सविस्तर असली, तरी एकदा का तुम्ही मैदानात उतरलात की, तुम्हाला तिथल्या परिस्थितीनुसार खेळावे लागते. या खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी योग्य ‘लेंथ’ (टप्पा) समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. मला वाटले की या खेळपट्टीवर ‘हार्ड लेंथ’वर गोलंदाजी करणे कठीण होते, तरीही आमचे गोलंदाज आणि फलंदाज याचा प्रभावीपणे फायदा उठवण्यात अपयशी ठरले, असं श्रेयस अय्यरने सांगितले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी: