आंबोली घाटात भले मोठे दगड स्त्यावर, वाहतूक सुरू असतानाच घडला भयंकर प्रकार | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

आंबोली घाटमार्गातील मुख्य रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर कोसळले.

News18
News18

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी जोरदार वाऱ्यांमुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हवामान विभागाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आंबोली घाटात भले मोठे दगड रस्त्यावर आले आहे. वाहतूक सुरू असतानाच घडला प्रकार घडला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आंबोली घाटातील दरडी कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या चार नंबर धबधब्यालगत आंबोली घाटमार्गातील मुख्य रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर कोसळले. या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ सुरु होती. मात्र ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी सुदैवाने त्या भागात कोणतंही वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असून दुचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांची एक मार्गी वाहतूक सुरू आहे.

दगड बाजूला काढत  वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी जेसीबी पाठविण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

नागरिकांना अडचणींचा सामना 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळेअनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. यामुळे काही घरांचे, वीजवाहिन्यांचे आणि स्थानिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विशेषतः सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात पडझडीच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे काही ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. गेले काही दिवस कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात येत आहे. 8 जुलैसाठी 9 जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नकाशानुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे राज्यातील कोकण विभागात पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नदी नाले ओलांडताना खबरदारी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *