Astrology : मालामाल व्हायला तयार राहा! पुढचे 32 सोन्यासारखे, 4 राशींचे लोक मोजणार फक्त नोटा; कुणाचं नशीब पालटणार? | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)


Last Updated:

ग्रहांची हालचाल अत्यंत खास आणि महत्वपूर्ण मानली जाते. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. या राशींना या काळात मोठा फायदा होईल.

News18
News18

Budh Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला बुद्धी, तर्क, संवाद, वाणी आणि व्यापाराचा कारक मानले जाते. जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या चाल किंवा नक्षत्रात बदल होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम देशातील व्यापार, शेअर बाजार आणि लोकांच्या आर्थिक स्थितीवर होतो. सध्या बुध ग्रह गुरूच्या स्वामित्वाच्या ‘पुनर्वसु नक्षत्रात’ विराजमान आहे. द्रिक पंचांगानुसार, बुध ग्रह 8 ऑगस्टच्या सकाळी 07:23 वाजेपर्यंत याच नक्षत्रात राहणार असून त्यानंतर तो शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. पुढील 32 दिवस बुध ग्रह गुरूच्या नक्षत्रात राहिल्याने ‘ज्ञान आणि बुद्धी’चा एक अद्भूत संयोग पाहायला मिळत आहे. या गोचरामुळे सर्व 12 राशींच्या जीवनात बदल घडतील, परंतु 4 राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

मेष

मेष राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे नक्षत्र गोचर अत्यंत सकारात्मक परिणाम घेऊन आले आहे. जे जातक व्यापार, ट्रेडिंग किंवा लॉजिस्टिक्सच्या व्यवसायात आहेत, त्यांना पुढील 32 दिवसांत मोठा आर्थिक नफा मिळेल. तुमचे व्यावसायिक संबंध सुधारतील. घर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे नशिबाच्या साथीने पूर्ण होतील.

कन्या

कन्या राशीचा स्वामी स्वतः बुध ग्रह आहे, त्यामुळे गुरूच्या नक्षत्रातील बुधाची उपस्थिती तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप भक्कम होईल. ज्यांचे पैसे बाजारात किंवा कुठेतरी अडकले आहेत, ते या काळात परत मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कठोर मेहनतीचे योग्य फळ मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये हवे तसे यश मिळेल आणि भौतिक सुख-साधनांमध्ये वाढ होईल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ गुंतवणुकीतून भरपूर नफा कमावण्याचा आहे. जर तुम्ही शेअर बाजार, लॉटरी किंवा ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवत असाल, तर 8 ऑगस्टपूर्वी तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन चांगल्या नोकरीच्या संधी चालून येतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

मकर

मकर राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारे ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या बुद्धीचा आणि चातुर्याचा प्रभाव पाहायला मिळेल. तुमचे विरोधक किंवा शत्रू तुमच्यासमोर पराभूत होतील. नोकरीत प्रमोशन किंवा सन्मान मिळण्याचे योग आहेत. विनाकारण होणारे खर्च थांबतील आणि बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. आरोग्याशी संबंधित जुन्या तक्रारी दूर होतील.

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *