Maharashtra Epstein Files Swaroop Sawant: स्वरुप सावंत (Swaroop Sawant) दिग्दर्शित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ (Maharashtra Epstein Files) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. दिपाली सय्यद यांचा सिनेमातील फर्स्ट लूक पाहायला मिळाला. अभिनेत्रीने साकारलेले पात्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली. यानंतर रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्विकारत सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना नोटीस पाठवली. नोटीशीतून अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणावर आता ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीये. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ सिनेमाच्या दिग्दर्शकाने नेमकं काय म्हटलं? (Maharashtra Epstien File Director Swaroop Sawant)
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या सिनेमाचे 70 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सिनेमाच्या दिग्दर्शकांनी दिलीये. हा सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शक , कलाकार आणि तंत्रज्ञांना नोटीस बजावल्यानं, सर्वजण दडपणाखाली आले असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत म्हणाले, ‘आम्हाला या सिनेमाला थांबवण्याच्या संबंधित कायदेशीर मानहानीची नोटीस पाठवण्यात आली होती. चित्रपटाचं शूट आम्ही थांबवलेलं नाहीये. सिनेमा चालू राहणार आहे. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार, हे नक्की’, असं पत्रकार परिषदेत स्वरुप सावंत यांनी म्हटलं आहे. ‘आम्ही सामाजिक प्रबोधनासाठी हा सिनेमा करतो आहे. कुणाचीही मानहानी करण्यासाठी हा सिनेमा करत नाहीये. आम्ही देखील कलाकार आहोत. समाजाला संदेश देण्यासाठी आम्ही चित्रपट करतो’, असंही स्वरुप सावंत यांनी म्हटलं.
‘हा सिनेमा Inspired by true event नाहीये. ज्या गोष्टी समाजात घडतात. त्या गोष्टींना धरुन आम्ही सिनेमा तयार करुन प्रबोधन करत असतो. आमचा सिनेमा 100 टक्के 2 ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार. काही नोटीस आली तर आमची Legal टीम आहे, ती उत्तर देईल’, असंही स्वरुप सावंत म्हणाला. सिनेमाची कथा लिहिणारे सागर जैन आणि निर्माते देवेंद्र भट हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तर अभिनेत्री दिपाली सय्यद या पत्रकार परिषदेत ऑनलाईन उपस्थित होत्या .
महत्त्वाच्या इतर बातम्या: