मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेसवे) अत्यंत महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘नवयुगा इंजिनिअरिंग’ आणि ‘ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ (Afcons Infrastructure) या कंपन्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(Rohit Pawar On Missing Link)
आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले होते, याचे दाखले देत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘आता इथून पुढे हा शेवटचा ट्रॅफिक असेल,’ असे सांगत हा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. त्यांनी त्यावेळी राजकीय भूमिका मांडली होती, मात्र काल पुन्हा या मार्गावर मोठी ट्रॅफिक कोंडी (वाहतूक कोंडी) पाहायला मिळाली.(Rohit Pawar On Missing Link)
यापूर्वी मिसिंग लिंकवरील खड्ड्यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते. तसेच एखादा प्रकल्प स्थिर होण्यासाठी ‘एक पावसाळा जाऊ द्यावा लागतो,’ असे त्यावरती मुख्यमंत्री बोलले होते. यावर आक्षेप घेत रोहित पवार म्हणाले की, इथे केवळ शब्दांचा खेळ नको, तर कामाचा दर्जा (क्वॉलिटी) उत्तम असला पाहिजे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या या टनेलची (बोगद्याची) दुरवस्था झाली आहे. बोगद्यामध्ये क्रॅक (तडे) पडलेले पाहायला मिळाले असून, आतून पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत. त्यामुळे हा मिसिंग लिंक प्रकल्प नसून ‘भ्रष्टाचाराला लिंकिंग’ करणारा मार्ग आहे, असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला.(Rohit Pawar On Missing Link)
Missing Link Mumbai Pune: ‘ॲफकॉन्स’ आणि ‘नवयुगा’ या कंपन्यांवर सरकारने तात्काळ कारवाई
‘नवयुगा’ या कंपनीचा ‘व्हीएसआर’ कंपनीशी संबंध आहे. यापूर्वी व्हीएसआर कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नव्हती आणि तरीही मिसिंग लिंकचा हा महत्त्वाचा प्रकल्प नवयुगा कंपनीला देण्यात आला. जर या संपूर्ण प्रकल्पात एवढा मोठा घोटाळा झाला असेल, तर ‘ॲफकॉन्स’ आणि ‘नवयुगा’ या दोन्ही कंपन्यांवर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
Missing Link Mumbai Pune: साडेअठरा तासांच्या प्रयत्नांनंतर पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली
लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दिवसभर दरड कोसळून ठप्प झालेली पुणे-मुंबई मिसिंग लिंक (Missing Link) मार्गिका तब्बल साडेअठरा तासांनी खुली करण्यात आली. मात्र, सध्या केवळ दोनच लेनवरून वाहतूक सुरू आहे; कारण बोगद्याच्या वरून अद्यापही धबधब्यासारखे पाणी वाहत असून, त्यातून छोटे-छोटे दगडही खाली येत आहेत. त्यामुळे ‘इथला धोका खरंच टळला आहे का?’ असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (Maharashtra Rain news) काल दरड कोसळल्यानंतर मिसिंग लिंकवर १०० टन मातीचा ढिगारा खाली आला होता. अखेर साडेअठरा तासांच्या प्रयत्नांनंतर पुणे–मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली करण्यात आली आहे.