Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचरकरंजीमधील घटनेनं खळबळ


Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सातजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटल आहे. संशयितांनी पीडित शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे असं सांगून एका घरामध्ये बोलावून घेतलं होतं.

अत्याचार करतानाचा व्हिडीओचे चित्रीकरण

संशयितांपैकी एका अल्पवयीन तरुणाने तुझे अश्लील व्हिडीओ आहेत अशी भीती दाखवली, तर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार केला तसेच तिसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार करतानाचा व्हिडीओचे चित्रीकरण केलं. यावेळी संबंधित पीडित मुलीने झटापट करून त्यावेळी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर पूर्वी केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचं पोलिस तक्रारीत म्हटल आहे. पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी चौघेजण अल्पवयीन आहेत, तर तिघांना अटक केली आहे.

नेमका प्रकार काय घडला?

पोलिसांनी अमन आदम शेख (वय 20), अल्ताफ बशीर नायकवडे (वय 21), अनिकेत संजय भोरे (वय 23, तिघे रा. इचलकरंजी) यांना अटक करण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये संशयितांनी पीडित शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे, असे सांगून बोलावून घेतले. संशयिताच्या घरात इतर तिघेजण त्यावेळी उपस्थित असताना त्यापैकी एका अल्पवयीन संशयिताने तुझे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे असल्याची भीती दाखवली, तर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार केला तसेच तिसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार करतानाचा व्हिडीओचे चित्रीकरण केले. 

शाळेला जाताना सातत्याने पाठलाग 

संबंधित पीडित मुलीने झटापट करून त्यावेळी कशीबशी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर पुन्हा पूर्वी केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला धमकावत एका बोळात बोलावून घेतले. तिथे असलेल्या आणखी तीन संशयितांनी तिच्याशी झटापट करत विनयभंग केला. त्यावेळी पीडित मुलीने आपली सुटका करत धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तिचा अन्य एकाने पाठलाग करून विनयभंग केला. शाळेला जाताना एक संशयित तिचा सातत्याने पाठलाग करत होता, तर काही संशयित तिची छेडछाड करत तसेच अत्याचाराच्या व्हिडीओवरून आणि संशयितांच्या नावावरून त्या मुलीला टोमणे मारून त्रास देत होते. या प्रकारामुळे पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय भयभीत झाले होते. अखेर या त्रासाला कंटाळून तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *