Aadhaar Card: आधारकार्डबाबत सर्वात मोठा निर्णय; तब्बल 3 महिने सेवा मोफत, फक्त लहान मुले… – Marathi News | Aadhaar card new update blue Aadhaar card biometric free update for children till 30 September 2026 latest marathi news


ब्लू आधरकार्डबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. लहान मुलांचे आई-वडील आता 30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्डच्या बायोमेट्रिक मोफत अपडेट करू शकता. त्यानंतर शुल्क आकारले जातीत. त्यामुळे पालकांनी लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करता येईल. शैक्षणिक संस्थाच्या प्रवेशासाठी लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे येत्या 3 महिन्यात आधारकार्ड अपडेट करणे फायदेशीर ठरेल.  परंतु प्रशासनाने मोफत अपडेट करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. या तारखेनंतर पालकांना शुल्क भरावे लागतील.

लहान मुले मोठे होतात, त्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे, डोळ्यांची बाहुली आणि चेहऱ्यांमध्ये बदल पाहायला मिळतात. त्यामुळे या अचूक नोंदीसाठी पुन्हा बायोमेट्रिक करणे अनिवार्य ठरते. लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करण्याचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांना शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थेत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचे आधारकार्ड अपडेट करणे फायदेशीर ठरते. तसेच सरकारी योजनांचाही लाभ घेता येतो. स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येतो. इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी अर्ज करणे शक्य होते.

7 ते 15 दिवसांत मिळेल आधारकार्ड 

लहान मुलांचे आधारकार्ड बायोमेट्रिक अपटेड करण्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर एक अर्ज भरून मुलांच्या हाताचे ठसे द्यावे लागतात. डोळ्यांच्या बाहुल्यांचे स्कॅन करणे आणि फोटो देखील अपडेट करावा लागतो. आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 ते 15 दिवसांत आधारकार्ड घराच्या पत्त्यावर येईल.

UIDAI नियमानुसार, 5 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचं आधारकार्ड हे आई-वडिलांच्या आधारकार्डाच्या आधारावर तयार केले जाते. लहान मुलांचे आधारकार्ड तयार करण्यासाठी बायोमेट्रिक देखील करण्याची गरज भासत नाही. परंतु लहान मुलांचे आधारकार्ड तयार करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि केवायसीसोबत ओटीपी व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे. फक्त पालकांना मुलांच्या जन्माच्या तारखेचा पुरावा द्यावा लागतो. तसेच लहान मुलांच्या हाताचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन देखील केले जात नाही. त्यांच्याऐवजी पालकांमधील एकच्या हाताचे ठसे घेतले जातात. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *