केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात थेट 2 मंत्री भाजपा कार्यालयात, मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची चर्चा, मोठा दणका, महाराष्ट्र.. – Marathi News | Major update regarding the Union Cabinet expansion 2 Union Ministers have arrived at the BJP office


केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार आहेत. तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. तशी घोषणा लवकरच केली जाईल. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे. काही मंत्र्यांना थेट कॅबिनेटमधून नारळ मिळेल. नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याच्या पदरात खूप काही पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 3 खाती महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत. ठाकरेच्या शिवसेनेतून बंडखोरी 6 खासदारांनी केली. त्यानंतर यापैकी 2 जणांना थेट मंत्रिपद मिळणार असल्याचे सुत्रांकडून सांगितले जातंय. खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. हेच नाही तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची पदोन्नती होणार असून नरेंद्र मोदी त्यांच्यावर मोठी नवीन जबाबदारी देऊ शकतात.

नरेंद्र मोदी यांचा ताण कमी करण्यासाठी अमित शाह यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळवण्याकरिता मोठी लॉबिंगही सुरू आहे. त्यामध्येच केंद्रीय मंत्री अचानक भाजपा कार्यालयात दाखल झाल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दाैऱ्यावर होते.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन केंद्रीय मंत्री दिल्लीतील बीजेपी कार्यालयात पोहोचले होते. विशेष म्हणजे ते काही वेळातच कार्यालयातून बाहेर पडले. ज्यावेळी जोरदार चर्चा सुरू आहे की, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही मंत्र्‍यांची सुट्टी होणार आहे. कारण ते कार्यालयात गेले आणि काही वेळातच बाहेर पडले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्या कॅबिनेट मंत्र्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे, त्याची यादी तयार आहे. मात्र, या चर्चांवर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, झारखंड आणि कर्नाटकमधील आलेले केंद्रीय मंत्री पार्टी कार्यालयात कोणत्याही महत्वाच्या गोष्टीसाठी आले नव्हते तर ते नियमित येतात तसे आले होते आणि गेले.उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *