Maharashtra Epstein Files: नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. अशोक खरात याचे काळे कारनामे उघड झाले आणि सर्वांनाच धक्का बसला. सध्या अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ (Maharashtra Epstein Files) या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, या टीझरमधून अभिनेत्री दिपाली सय्यद यांची पहिली झलक पाहायला मिळत आहे. दिपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली. यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना, रुपाली चाकणकर यांनी सिनेमाच्या टीमविरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, यावर रुपाली चाकणकर यांनी अॅक्शन घेतली असून, त्यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्विकारला आहे. त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना नोटीस पाठवली आहे. तसेच नोटीशीतून अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’च्या टीमला रुपाली चाकणकर यांनी नोटीस धाडली (Maharashtra Epstein Files in Legal Trouble Deepali Sayyad)
अशोक खरात याचे प्रकरण उघड होताच, त्याचे काही राजकीय कनेक्शनही समोर आले होते. त्याचे रुपाली चाकणकर यांच्याशी चांगले संबंध असल्याचं म्हटलं जात होते. दरम्यान, ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ चा फर्स्ट लूक समोर येताच रुपाली चाकणकरांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. आपली जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला असून, त्यांनी सिनेमाच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावलीये. या नोटीशीतून सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे.
या नोटीशीत, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील रुपाली चाकणकर यांचे नाव टीझर आणि इतर वेबसाइट्सवर वापरण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असल्याचा आरोपही नोटीशीतून करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्याकडून 25 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धाडण्यात आलेल्या नोटीशीला पुढील सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर टीमकडून काय उत्तर देण्यात येईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, या प्रकरणामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?