Aamir Khans Third Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने तिसऱ्यांदा लग्न केले आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) यांचं आता अधिकृतरित्या लग्न झाले आहे. आमिर खानने त्याच्या राहत्या घरातच खासगी पद्धतीने लग्न केले आहे. मुंबईतील (Mumbai Brand) वांद्रे येथील त्याच्या पाली हिल निवासस्थानी दोघांनी लग्नगाठ बांधली. आमिर खानचं हे तिसरं लग्न असून, गौरी स्प्रॅटचं हे दुसरं लग्न आहे. काही मोजक्या फॅमिली मेंबर आणि मित्रांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. काही महिन्यांपूर्वी आमिर खानने गौरीला मीडियासमोर आणलं होतं. दोघांच्या लग्नाच्या प्रचंड चर्चा रंगू लागल्या होत्या. सध्या त्यांच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
आमिर खानच्या लग्नातील फोटो व्हायरल (Aamir Khan and Gauri Spratt Wedding)
दिखावा, किंवा बिग फॅट वेडिंग न करता आमिर खानने अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचं लग्न झालं असून, त्यांनी राहत्या घरात अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे. बॉलिवूडमधील कपल डेस्टिनेशन वेडिंग शिवाय करत नाहीत. पण आमिर खान आपल्या पर्सनल आयुष्यातील गोष्टी प्रायव्हेट ठेवायच्या होत्या. अगदी 100 ते 150 लोकांच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. ज्यात कुटुंबातील काही सदस्य, जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील काही मित्रांचा समावेश आहे.
आमिर खानच्या लग्नसोहळ्यात इरा खान, जुनैद खान देखील उपस्थित होते. तर, आमिर खानचा सर्वात लहान मुलगा आझाद आणि गौरीचा मुलगा देखील या लग्नसोहळ्यात उपस्थित होता. या खास लग्नसोहळ्यानिमित्त आमिर खान आणि गौरी स्प्रॅट या दोघांचीही फॅमिली एकत्र आली होती. सध्या या लग्न सोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे जोडपे आमिर खान गौरी तसेच इतर परिवारातील सदस्य दिसत असून, आमिर खान मॅरेज डॉक्यूमेंटवर सही करत असल्याचं दिसत आहे.
या लग्न सोहळ्यात आमिर खानची आई झीनत हुसेन देखील उपस्थित होते. लग्नासाठी आमिर खानने खास पांढरा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. ज्यावर ब्राँझचा ब्रोच लावण्यात आला होता. तर, गौरीने बेज रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. दोघेही साध्या लूकमध्येही सुंदर आणि मोहक दिसत होते. या लग्नसोहळ्यात चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर, एली अवराम, इरफान पठाण, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि वीर दास उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?