हाय राम! अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा… गर्लफ्रेंडची एंट्री… आरोपीने कुठे उधळले पैसे? – Marathi News | Ayodhya Ram Mandir Donation Scam Accused Avinash Shukla and his girlfriend where he has expensed amount


Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याने देशात संतापाची लाट उसळली. राम भक्तांमध्ये असंतोष आहे. त्यातच या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहे. आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीतील 15 लाख रुपयाहून अधिकची हेराफेरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राम मंदिरातील तिजोरीवर दरोडा घालत आरोपी अविनाश शुक्लाने त्याच प्रेयसीवर ही रक्कम उधळल्याचे समोर आले आहे.

गर्लफ्रेंडला महागडा मोबाईल

अविनाश शुक्ला हा राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपी आहे. त्याने 15 लाखांहून अधिक रक्कमेची हेराफेरी केल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपीने चोरीच्या रक्कमेतून त्याच्या प्रेयसीला महागडा मोबाईल गिफ्ट दिल्याचे उघड झाले आहे. तर गर्लफ्रेंडला त्याने खर्चासाठी दोन लाख रुपये नकदी दिल्याचेही समोर आले आहे. तर त्याने अजून इतर ठिकाणीही पैसा उधळल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याने हा पैसा कसा आणि कुठून चोरला याचा पोलीस तपास करत आहेत.

भावाने विचारताच वळली बोबडी

अविनाशचा भाऊ अभिषेक शुक्ला याला त्याच्यावर संशय आला होता. राम मंदिरातील ड्युटी संपल्यानंतर तो भली मोठी रोख रक्कम घेऊन योग केंद्रात जात असे. त्याविषयी विचारल्यावर अविनाश व्यवस्थित उत्तर देत नव्हता. एकदा त्याने सांगितले की भाविक भक्त आनंदाने त्याला ही रक्कम देतात. कारण तो त्यांना दर्शनासाठी मदत करतो. पण भावाला त्याचे हे उत्तर काही पटले नव्हते. त्याने याविषयी शंकाही व्यक्त केली होती. आता तपासादरम्यान त्याने अधिकाऱ्याला योग केंद्रावर ही रक्कम नेण्यात येत होती याची माहिती दिली आहे.  याप्रकरणात इतर धागेदोरे लागतात का, याचा पोलीस तपास करत आहेत.

एसआयटीकडून चौकशी

याप्रकरणी आठहून अधिक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काही संचालक एसआयटीच्या रडारवर आहेत. याप्रकरणी अनेक दिग्गज आता बोलताना अडखळत आहेत. ज्यांनी राम मंदिर बांधल्यानंतर जल्लोष केला होता, ते लोक या प्रकरणावर काहीच बोलत नसल्याने राम भक्त संतापले आहेत. दरम्यान पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. घर, दुकान, नातेवाईक, बँका आणि इतर ठिकाणी तपास सुरू आहे. आरोपीं आणि इतरांची चौकशी करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *