Vaibhav Suryavanshiचा फक्त डेब्यू झाला नाही, पहिल्याच मॅचमध्ये केला नकोसा रेकॉर्ड; नेमके काय झाले मैदानावर | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

IND vs ENG: अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत इतिहास रचला. मात्र पहिल्याच सामन्यात एक नोकसा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला.

News18
News18

मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इतिहास रचला गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात बिहारच्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाची कॅप प्रदान करण्यात आली आणि त्याच क्षणी त्याने क्रिकेट विश्वातील अनेक मोठ्या विक्रमांना मागे टाकले.

अवघ्या 15 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत सूर्यवंशीने असा पराक्रम केला. जो अनेक दिग्गज खेळाडूंना संपूर्ण कारकिर्दीतही करता आलेला नाही. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो 14 धावांवर बाद झाला. तरीही या छोट्याशा खेळीत त्याने स्फोटक फलंदाजीची झलक दाखवली. या ऐतिहासिक सामन्यात वैभवच्या नावावर आणखी एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली जी कदाचित त्याला लक्षात ठेवावीशी वाटणार नाही.

भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात युवा क्रिकेटपटू

वैभव सूर्यवंशी मैदानात उतरताच त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले. तो आता कोणत्याही क्रिकेट प्रकारात भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. याशिवाय पूर्ण सदस्य (Full Member) देशाकडून पुरुषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारा जगातील सर्वात युवा क्रिकेटपटू बनण्याचाही मान त्याने मिळवला.

नकोसा वाटणारा विक्रमही नावावर

या सामन्यात वैभवच्या नावावर आणखी एक वेगळा विक्रम नोंदवला गेला. 10 चेंडूत 14 धावा केल्यानंतर तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे तो एका अशा यादीत सामील झाला, ज्यामध्ये कोणत्याही खेळाडूला स्थान मिळावे असे वाटणार नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात स्टम्प आऊट होणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू असा विक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर नोंदवला गेला आहे.

ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी वेग आणि अतिरिक्त उसळी (बाऊन्स) यासाठी ओळखली जाते. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंग याने आपल्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीने 15 वर्षीय युवा सलामीवीराची चांगलीच परीक्षा घेतली. टंगच्या वेग आणि सीम मूव्हमेंटसमोर वैभव काहीसा संघर्ष करताना दिसला. आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात तो दोन वेळा चेंडू पूर्णपणे चुकला. दुसऱ्या टोकाला त्याचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्मा यालाही खेळपट्टीच्या बदललेल्या स्वभावाशी जुळवून घेण्यात अडचणी येत होत्या.

अखेर जोश टंगच्या अचूक यॉर्करवर वैभवने संयम दाखवत बॅट लावली. चेंडू बॅटच्या आतील कडेला लागून फाइन लेगच्या दिशेने गेला आणि एक धाव घेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली रन काढली.

जोफ्रा आर्चरविरुद्ध दाखवला

सुरुवातीच्या संघर्षानंतर वैभवने आक्रमक खेळ दाखवण्यास सुरुवात केली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून त्याच्यासोबत खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरसमोर येताच वैभवने मोठे फटके खेळण्याचा निर्णय घेतला.आर्चरच्या एका वेगवान चेंडूवर त्याने लेग स्टंपच्या दिशेने सरकत चेंडूचा वेग वापरला आणि यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून अप्रतिम स्कूप शॉट खेळला. चेंडू थेट सीमारेषेबाहेर जाऊन पडला.

संपली ‘तुफानी कॅमिओ’ खेळी

वैभवची ही आक्रमक शैलीच अखेरीस त्याच्या बाद होण्याचे कारण ठरली. इंग्लंडच्या कर्णधाराने ऑफस्पिनर विल जॅक्सला गोलंदाजीला आणले. हा पूर्णपणे रणनीतीचा भाग होता. विल जॅक्स गोलंदाजीसाठी येताच वैभवने पुढे सरकत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र जॅक्सने चातुर्य दाखवत चेंडूचा वेग किंचित वाढवला आणि तो ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकला. वैभव चेंडू पूर्णपणे चुकला. आणि जोस बटलरने क्षणाचाही विलंब न करता चेंडू पकडला आणि त्याला स्टम्प आऊट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *