पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. कर्मचारी भविष्यनिधी संघटनेने (EPFO) युनिफाइड मेंबर पोर्टल अपग्रेड केल्यानंतर आणखी एक बदल केला आहे. आता पीएफ खातेदारांना वेबसाइटवर UAN अॅक्टिव्हेट करता येणार नाही. त्याचबरोबर दुसरा देखील UAN तयार करता येणार नाही.
कर्मचाऱ्यांना करावे लागेल फेस ऑथेंटिकेशन
ईपीएफओने वेबसाइटवर दोन महत्त्वपूर्ण सुविधा पूर्णपणे बंद केल्या नाहीत,परंतु या सुविधा केंद्र सरकारच्या UMANG अॅपवर शिफ्ट केल्या आहेत. आता नवीन आणि जुन्या सदस्यांना उमंग अॅपचा वापर करावा लागणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने UAN अॅक्टिव्हेशन आणि अलॉटमेंटच्या आधारावर फेस ऑथिंटेकशन अनिवार्य करण्यात आलं आहे. याचा अर्थ चेहरा स्कॅन केल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. आता तुम्हाला सर्वात आधी गुगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोरवरून UMANG अॅप डाऊनलोड करावा लागेल. अॅप उघडल्यानंतर EPFO Services पर्याय निवडावा लागेल. आता UAN Services Through Face Auth अंतर्गत UAN Activation वर क्लिक करावे. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावे.
कर्मचाऱ्यांना करावे लागेल कागदपत्रे अपलोड
ज्या कर्मचाऱ्यांना UAN जनरेट करायचे आहे. त्यांना उमंग अॅपवर जाऊन ‘UAN Allotment and Activation’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला UAN मिळेल. खरंतर UAN पुन्हा मिळवण्यासाठी प्रक्रिया आणखी सोपी करण्यात आली आहे. आता यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नंबर टाकावे लागेल. त्यानंतर ओळखपत्र/घराचा पत्ता यांसारखी कागदपत्रे अपलोड करावी लागेल. पुढे मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर व्हेरिफाय करावा लागेल. आता ईपीएफओ पोर्टलवर डेथ क्लेम फाइल करण्याची सुविधा मिळत राहील. याच्या लाभार्थ्यांसाठी आधार लिंक मोबाईल, मृत्यूप्रमाणपत्र, बँक कागदपत्रे यांसारखे पुरावे PDF फॉर्मेटमध्ये अपलोड करावे लागतील. तसेच ही पीडीएफ फाइल 2MB पेक्षा मोठी नसावी. तुमची फाइल 2MB पेक्षा मोठी असल्यास तुम्हाला इतर अॅपचा वापर करून कमी करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुमचे काम सोयीस्कर होईल.