Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात ‘चौथ्याची’ एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?


पुणे : केतन अग्रवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी, लोहगड मर्डर केसमध्ये आतापर्यंत ही तीनच नावं संपूर्ण देशाला माहिती आहेत. पण आता त्यात चौथ्याची एन्ट्री होण्याची (Ketan Agrawal Case) शक्यता आहे. कोण आहे तो चौथा…? त्याचा या हत्या प्रकरणाताला नेमका रोल काय? तो गजाआड होणार की तुरूंगाबाहेरच राहणार? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.(Ketan Agrawal Case)

लोणावळ्यातल्या लोहगडावरून ढकलून ज्याची हत्या करण्यात आली, तो केतन अग्रवाल…केतनशी जिचा साखरपुडा झाला होता, मात्र जिनं प्रियकराच्या मदतीनं केतनच्या हत्येचा (Ketan Agrawal Case) कट तडीस नेला, ती सिया गोयल….केतनच्या हत्येच्या दिवशी स्वतः लोहगडावर हजर राहिलेला सिया गोयलचा (Ketan Agrawal Case) प्रियकर चेतन चौधरी…आजवर केतन हत्या प्रकरणात आपल्याला हे तीनच पात्र माहिती होते…मात्र आता त्यात चौथ्याची एन्ट्री झालीय आणि ते पात्र म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीचा जवळचा मित्र आणि त्या मित्राला केतनच्या हत्येच्या कटाची पूर्वकल्पना होती अशी धक्कादायक माहिती समोर येतेय. (Ketan Agrawal Case)

Ketan Agrawal Case : चेतनच्या मित्राला हत्येचा कट माहिती होता?

केतन अग्रवालचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या करायचं सिया आणि चेतन या जोडगोळीनं ठरवलं आणि या हत्येच्या कटाबाबत चेतनच्या एका जिवलग मित्रासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती अशी माहिती समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर हत्येच्या दिवशी म्हणजे १८ जूनला त्या मित्रानं लोहगडावर यावं असा सिया आणि चेतनचा आग्रह होता. मात्र तो लोहगडावर गेला नाही. तसंच केतनची हत्या केल्यानंतर चेतन सर्वात आधी याच मित्राला देखील भेटल्याचं समजतंय. केतनच्या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी चेतनच्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.(Ketan Agrawal Case) आता जर आरोपी चेतन चौधरीच्या मित्राला केतनच्या हत्येची पूर्वकल्पना होती. तसंच जर हत्येनंतर चेतन त्या मित्राला भेटला असेल. तर तो मित्र देखील कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो का? याचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही वकिलांना गाठलं.

Ketan Agrawal Case : चेतनचा तो मित्रही कायद्याच्या कचाट्यात अडकणार?

सिया आणि चेतनबरोबर तो मित्र देखील तुरूंगाची हवा खाणार का? हे त्याच्याविरोधात किती सबळ पुरावे मिळतात यावर अवलंबून असेल. दुसरीकडे सिया आणि चेतनची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अपयश आलं आहे.

आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या डेटामध्ये सांकेतिक भाषेत संभाषण केल्याचं आढळून आलं आहे. त्याचा तपास करण्यासाठी, तसंच, हत्येच्या कटात आणखी कुणी जवळचा व्यक्ती सहभागी आहे का याचा शोध घेण्यासाठी… सरकारी वकिलांनी सिया गोयल आणि चेतनची तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.. मात्र न्यायालयानं ही मागणी अमान्य करत दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलीय. त्यामुळे सिया आणि चेतन यांना लवकरच जामीन मिळू शकतो का असा प्रश्नही आता चर्चिला जाऊ लागलाय. 

तर सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट देखील होणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलिसांसमोरचं आव्हान काहीसं वाढलंय. आता केतन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्र कोणत्या दिशेनं आणि किती वेगाने फिरतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल.

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल खुनाचा कट आणखी एका तरुणाला माहिती 

केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एका तरुणाचे नाव समोर येते आहे. हा तरुण चेतन चौधरी याचा वर्ग मित्र आहे. केतनच्या खुनाचे प्लॅनिंग चेतन आणि सिया या दोघांनी त्याच्यासोबत डिस्कस केले होते. त्या तरुणाला लोहगडावर चालण्याचा देखील आग्रह या दोघांनी केला होता. मात्र तो तरुण 18 जून रोजी लोहगडावर गेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटला आहे. सिया देखील या तरुणाला बोलली आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान या तरुणाने केतन याचा खून करू नका असे देखील चेतन आणि सिया या दोघांना सांगितल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *