Uday Samant : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंग रोड साठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला आणि जुन्या अलाइनमेंट नुसार रिंग रोड व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांचनी केली होती. हे सर्व शेतकरी मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी रवाना होत असताना त्यांना नाशिक पोलिसांनी अडवले होते. पोलीस हेडकॉटर येथे दिवसभर बसवून ठेवत ताब्यात घेतले मात्र शेतकऱ्यांनी रात्री पोलीस हेडकॉटर येथेच काम करत आंदोलनाचा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून जमिनींना योग्य मोबदला देण्याचं आश्वासन
यावेळी नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून जमिनींना योग्य मोबदला देण्याचा आश्वासन दिले. हे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील अधिकाऱ्यांचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बोलणे करून दिले. मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांसमोर फोनवरून शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली आणि सकारात्मक निर्णय घेण्याचा आश्वासन देखील मंत्री भोसले यांनी दिले. या बैठक व निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही असे अस्वस्थ शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांच्या बैठकीची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आंदोलन स्थगित करून सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा न्याय मिळेल असा विश्वास देण्यात आला.
नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी अयोग्य अलाइनमेंट आणि अपुरा मोबदला
नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी अयोग्य अलाइनमेंट (नकाशा) आणि अपुऱ्या मोबदल्याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यापूर्वी त्यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानांवर धडक देत रास्ता रोको आणि आमरण उपोषणही केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भूसंपादन वेगाने होत असले, तरी शेतकरी भूमीहिन होण्याच्या भीतीने अलाइनमेंट बदलण्याची व योग्य मोबदल्याची मागणी करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना मध्यम मार्ग काढून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. बियाण्यांची खरेदी यापूर्वीच झाल्याने कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी तुलनेने कमी होती. आगामी काळात वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाल्यास भात उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर