BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!


Ritu Tawde Kishori Pednekar मुंबई :  चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड पडून 10 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यान आणि साकीनाका येथील खैरानी रोड येथे मेनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्यानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रशनचिन्ह निर्माण झालं आहे. विरोधी पक्षांकडून मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली. उपमहापौर संजय घाडी यांनी काल महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत एक्सवर पोस्ट केली आणि अश्विनी भिडे यांचं समर्थन करत कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या सर्व घडामोडींमुळं मुंबई महापालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आज विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यामध्ये पावसाळ्याच्या संदर्भातील विशेष सभेच्या मुद्यावरुन शाब्दिक वाद झाला. 

किशोर पेडणेकर आणि रितू तावडेंमध्ये वाद कशावरुन?

मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांचा फोनवरून शाब्दिक वाद झाला आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने विशेष सभेचं नियोजन व्हावे, यासाठी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे सह इतर 4 सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौर कार्यालयात वारंवार देऊन ही उत्तर मिळालं नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी  याबाबत  संताप व्यक्त करत महापौर दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. 

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट अधिकाऱ्यांची कामे त्यांना सांगत चांगलेच सुनावले. महापौर दालनात नसल्याने त्यांची भेट मात्र झाली नाही.  हा प्रकार घडताच महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांना फोन केला.या फोनवर माझ्या कार्यालयात येऊन असे करणे योग्य नाही अशी भूमिका महापौरांनी मांडली. 

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर रितू तावडे यांना उत्तर देताना म्हटलं की, मी तुमच्या दालनात आलेली नाही. बाहेर असलेले कर्मचारी कार्यालय हे सगळ्यांसाठी खुले आहे. ते काम करत नव्हते त्यांना उत्तरं विचारण्यात आली. एकूणच या प्रकरणावरुन महापौर आणि विरोधी पक्षनेत्या यांच्यात वाद सुरू झाला.

स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनी देखील महापालिका सचिवांना पत्र लिहिले आहे. स्थायी समिती सदस्य टी प्रभू, रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव आणि अशरफ आझमी यांच्या सह्या असलेल पत्र समोर आलं आहे. पावसाळ्याच्या निमित्तानं पत्रातून महानगरपालिकेची तातडीने विशेष सभा बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पत्रात चेंबूर आणि साकीनाका येथील घटनेचा उल्लेख आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *