Vicky Kaushal Aamir khan 3rd marriage: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir khan) बऱ्याचदा प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता सध्या आपल्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. माहितीनुसार, आमिर खान 5 जुलै 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत अभिनेता लग्न करणार असल्याची माहिती आहे. माध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्याने, ‘होय. माधं लग्न 5 जुलैला आहे’, असं म्हणत कबुली दिली. दरम्यान, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियात पसरताच बी- टाऊनमध्ये एकच चर्चा रंगली आहे. यावर अभिनेता विक्की कौशलचीही रिअॅक्शन समोर आली आहे.
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर विक्की कौशलची प्रतिक्रिया (Vicky Kaushal Reaction to Aamir Khans Third Wedding)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिकडेच विक्की कौशल मुंबईतील एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला आमिर खानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. विक्की कौशलने अगदी खास अंदाजात या प्रश्नाचं उत्तर दिलं. इव्हेंटमध्ये पापाराझींनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ‘आमिर खानचं लग्न होणार ही बातमी खरी आहे?’ असा प्रश्न विक्कीला विचारण्यात आला.
विक्कीला पापाराझींनी, आमिर खानने देखील या बातमीबद्दल माहिती दिलीये, असं सांगितलं. पापाराझींच्या प्रश्नावर विक्की हसून म्हणाला, ‘मी दोघांनीही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी त्यांच्यासाठी खूप आनंदित आहे’, असं विक्की म्हणाला. सध्या विक्कीची ही रिअॅक्शन सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आमिर खानने स्वत: पापाराझींसमोर लग्नाबद्दलची कबूली दिली.
माध्यमांशी संवाद साधताना आमिर खान म्हणाला, ‘माझं लग्न 5 जुलै रोजी होणार आहे. हे लग्न अगदी साध्या आणि खासगी पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यात फक्त काही जवळचे मित्र आणि आमची दोन्ही कुटुंब उपस्थित राहतील. आम्ही घरीच लग्न करणार आहोत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरुन आम्ही दोघेही आनंदित राहू’, असं अभिनेता म्हणाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट मुंबईतील आमिरच्या घरात रजिस्टर मॅरेज करणार आहेत. यानंतर फॅमिली मेंबर, आणि मित्र परिवारांच्या उपस्थित छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. मुख्य म्हणजे या लग्नात दोन्ही मुलांची उपस्थिती असेल. जुनैद खान, आयरा खान आणि आझाद या लग्नात उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: