हिंदी रश सोबत सुचित्रा ट्रोलिंगच्या मुद्यावर बोलली. मलाच माहित नाही, लोक मला काय-काय बोलले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबतही माझं नाव जोडण्यात आलं.
मला सांगितलं तू भारत सोडं. मला बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. कारण मी जाहीरपणे माझी मतं मांडली. पण आज मी या गोष्टींचं टेन्शन घेत नाही.
मी स्वत:ला कितीही शांत ठेवलं, तरी माझ्यातून आंदोलकांची ती इच्छा जातच नाही. मी जर एखाद्या गोष्टीबद्दल विचार करते, तर मी स्वत:ला त्यावर बोलण्यापासून रोखू शकत नाही.
मध्येच रात्री मला काही वाटलं, तर माझं मत मी टि्वटरवर व्यक्त करते. मी भरपूर ट्रोल होते. पण याचा सामना करणं मी आता शिकलय. ट्रोलर्सनी मला दाऊदची मिस्ट्रेस म्हणूनही हिणवलं. मी अजानवर टि्वट केलं होतं. मी जेव्हा रामावर व्लॉग लिहिला तेव्हा मला लोकांच्या शिव्या पडल्या. लोकांनी सांगितलं भारत सोडून पाकिस्तानात निघून जा.
ही सर्व बकवास सुरु असते. प्रत्येक गोष्टीवर ट्रोलिंग होते. कधी कधी गप्प बसते. पण स्वत:ला थांबवू शकत नाही तेव्हा बोलते. माझा त्रास पाहून मुलगी सुद्धा मला लिहिण्यापासून रोखते.




