महागाईवर RBI चे मोठे संकेत, 4 टक्क्यांचे उद्दिष्ट राहणार कायम, गव्हर्नरांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास – Marathi News | RBI Governor signals 4 percent inflation target to stay expresses strong confidence in Indian economy


गव्हर्नरांच्या मते, दीर्घकाळात जागतिक परिस्थिती अनुकूल राहिल्यास भारताचे महागाईचे उद्दिष्ट आणखी कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. याच वेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत गतीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत देशाचा विकास दर (GDP) 7.8 टक्के राहिल्याने भारतीय बाजारपेठ वेगाने प्रगती करत असल्याचे चित्र आहे. भारतातील अधिकृत महागाईचे लक्ष्य याक्षणी वाढवण्याची शक्यता नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे की, सध्याचे महागाईचे टार्गेट देशासाठी योग्य आहे आणि येत्या काळात ते वाढवण्याची गरज नाही. दीर्घकाळात परिस्थिती अनुकूल राहिली तर चलनवाढीचे लक्ष्य आणखी कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत विकास दरावरही त्यांनी विश्वास व्यक्त केला.

‘RBI’ चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रशियात आयोजित बँक ऑफ रशियाच्या फायनान्शियल काँग्रेसच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर एलविरा नबीउलीना यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, भारताचे सध्याचे चलनवाढीचे लक्ष्य यशस्वी झाले आहे आणि यामुळे गेल्या काही वर्षांत सरासरी महागाई दर नियंत्रित करण्यात मदत झाली आहे.

महागाई टार्गेट सिस्टिम 2016 पासून लागू

भारताने 2016 मध्ये महागाईचे टार्गेट निश्चित करण्याची पद्धत लागू केली. याअंतर्गत रिटेल इन्फ्लेशनला सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेत राखण्याचे RBI चे उद्दिष्ट आहे. सध्या सरकारने महागाईचे टार्गेट 4 टक्के ठेवले आहे, तर त्याची स्वीकार्य श्रेणी 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान आहे. या वर्षी मार्चमध्ये केंद्र सरकारने हे लक्ष्य पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

संजय मल्होत्रा म्हणाले की, नजीकच्या काळात महागाईचे टार्गेट वाढवण्याची कोणतीही शक्यता नाही. तथापि, विकसित देशांमध्ये महागाईचे लक्ष्य तुलनेने कमी आहे, असेही ते म्हणाले. अशा परिस्थितीत जर भविष्यात आर्थिक परिस्थिती फ्रेंडली असेल तर भारत दीर्घकाळात आपले महागाईचे टार्गेट कमी करण्याचा विचारही करू शकतो.

महागाई लक्ष्याच्या खाली

येत्या काही महिन्यांत महागाईत काही प्रमाणात वाढ होऊ शकते, परंतु सध्या ते मध्यवर्ती बँकेच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे, याकडे RBI गव्हर्नर यांनी लक्ष वेधले. भारताचा किरकोळ महागाईचा दर मे 2026 मध्ये 3.93 टक्के नोंदविण्यात आला, जो आरबीआयच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहे.

या कार्यक्रमात बोलताना मल्होत्रा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक चित्र सादर केले आणि आगामी काळात भारताची आर्थिक वाढ मजबूत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 7.8 टक्क्यांनी वाढली, जी मजबूत आर्थिक घडामोडींचे द्योतक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *