वीकेंड संपता संपता सराफा बाजारात खळबळ
आठवडा संपायला अजून दोन दिवस बाकी आहे. त्यात रविवारी सुट्टी आहे. त्या आधीच सराफा बाजारात मोठी घडामोड घडली आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भाव पुन्हा एकदा उसळले आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. सोनं खरेदी करावं की करू नये अशा मनस्थितीत लोक जाण्याची शक्यता आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात 3 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 895 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी शेवटी सोने चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. पुढच्या आठवड्यात काय भाव राहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय?
आंतरराष्ट्रीय मार्केट कॉमेक्समध्ये सोन्याच्या भावात उसळी आली आहे. कमकुवत अमेरिकन डॉलर आणि व्याज दरात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याने सोन्याच्या भावाने उसळी घेतली आहे. आकेडवारीनुसार, सोन्याच्या दरात 1.63 टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे किमत 69.20 डॉलरने वाढून 4,194 डॉलर प्रति औसवर गेली आहे. तर चांदीच्या दरात 2.83 टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या चांदी 62.790 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहे.
भारतात काय?
तर भारतात एमसीएक्समध्येही सोन्याचे भाव वाढलेले दिसत आहेत. सोनं सुमारे 1.45 लाख प्रति 10 ग्रॅमहून 1.47 लाख प्रति 10 ग्रॅम (24 कॅरेट)च्या आसपास गदेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार होत आहे. त्या तुलनेत आज थोडा बॅलन्स झालेला दिसत आहे.
चांदीचे दरही वाढले….
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी दोन टक्क्याने वाढली आहे. तर घरेलू बाजारातही चांदीचे भाव मजबूत झालेले दिसत आहेत. भारतात चांदीचे भाव सुमारे 2.37 लाख ते 2.38 लाख प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहेत. गेल्या काही दिवसाच्या तुलनेतील हे भाव अधिक आहे.
भाव का वाढत आहे?
अमेरिकेतील जॉब डेटा कमकुवत आल्याने डॉलर कोसळले आहेत.
व्याज दरात वाढ होण्याची शक्यता.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदीची वाढलेली मागणी.
वैश्विक अनिश्चितता आणि गुंतवणूकदरांचा कल.