स्वत:ला बॉलिवूडचा बाप समजू नकोस..; सलमान खानवर भडकला निर्माता, डायरेक्ट भाईजानलाच चॅलेंज – Marathi News | Kala Hiran Film vs Salman Khan, Producer slams dabang star , Vows 8000 Screen Release


‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ (Blackbuck: Battle for Legacy) हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. 1 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयातया चित्रपटाबाबत सुनावणी झाली आणि त्यानंतर ती 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. अभिनेता सलमान खाननेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. यावरून बराच वाद सुरू असून आता निर्मात्याने थट सलमान खानवर टीका करत त्याला सुनाववलं आहे. एवढंच नव्हे तर
हा चित्रपट जगभरातील 8000 चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल असा दावाही निर्मात्याने केलाय.

‘काला हिरण: बॅटल फॉर लेगसी’ (Kala Hiran: Battle for Legacy) या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी अभिनेता सलमान खानने न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या याचिकेत त्याने या चित्रपटाचे निर्माते आणि त्याशी संबंधित सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र सलमान खानने स्वतःला बॉलीवूडचा ‘बाप’ (father) समजणं थांबवावं; हा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होईल, अशा शब्दांत निर्मात्याने सुनावणीनंतर इशारा दिला.

सलमान खानवर टीकास्त्र

सलमान खानच्या याचिकेवरील सुनावणीनंतर, निर्माता अमित जानी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्यावर जोरदार टीका केली. ‘सलमान खानला आज दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही आणि चित्रपटावर कोणतीही बंदीही घालण्यात आली नाही’, असं त्यांनी ‘ X ‘वर (आधीचे ट्विटर) माहिती देताना त्यांनी नमूद केलं. एवढंच नव्हे तर ‘ हे प्रकरण ६ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे (सलमानने) स्वतःला बॉलीवूडचा ‘बाप’ म्हणवून घेतल्यामुळे ‘काला हिरण’ (Kala Hiran) या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं जाणार नाही; हा चित्रपट एकाच वेळी 8000 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल’असंही त्यांनी या ट्विटमधून सुनावलं.

सलमानचे प्रयत्न अयशस्वी

काला हिरण या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी अभिनेता सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटामुळे त्याची प्रतिमा मलीन होऊ शकते, असं त्याचं म्हणणं आहे. हा चित्रपट 1998 मधील कुख्यात ‘काळवीट’ (ब्लकबक) शिकार प्रकरणावर आधारित असल्याचा त्याचा दवा आहे. जरी चित्रपटात त्याचे नाव स्पष्टपणे कोठेही नमूद केलेले नसले, तरीही पोस्टर, प्रचाराचे साहित्य आणि निर्मात्यांनी दिलेले संकेत यांवरून असे सूचित होते की हा चित्रपट त्याच्यावरच आधारित आहे, असंही सलमानचं म्हणणं आहे.

जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं, तेव्हा सलमानच्या याचिकेत असं नमूद करण्यात आलं होतं की त्यातील पात्र त्याच्याशी खूप मिळतेजुळते होते; तसेच पोस्टरमध्ये त्या पात्राला ज्या प्रकारे हातात बंदूक घेऊन दाखवण्यात आलं होतं, त्यावरूनही सलमानच्या स्वतःच्या लूकची आठवण होत होती, असंही याचिकेत म्हटलं होतं. सुनावणीदरम्यान, जेव्हा न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे का, अशी विचारणा केली, तेव्हा प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही असं निर्मात्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *