मग इथे आलाच कशाला?..जे रितेशला जमलं नाही, ते कंगनाने एका झटक्यात करून दाखवलं, राम कपूरची बोलती बंद – Marathi News | Kangana Ranaut slams Ram Kapoor on Lock Upp 2 If you think you are too big why netizens call her real queen


‘लॉक अप’ या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख आणि कोरिओग्राफर फराह खान करत आहेत. पहिल्या एपिसोडपासून जरी हा सिझन चर्चेत आला असला तरी त्यात प्रेक्षकांना काहीतरी कमतरता जाणवत होती. अखेर जेव्हा ‘लॉक अप’च्या पहिल्या सिझनची सूत्रसंचालक कंगना राणौत यात परत आली, तेव्हा सर्वांनीच ‘खरी क्वीन’ परतल्याच्या कमेंट्स देण्यास सुरुवात केली. शोमध्ये येताच कंगनाने तिच्याच अंदाजात एकेका स्पर्धकाची शाळा घेतली. या एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

‘लॉक अप 2’च्या पाचव्या एपिसोडमध्ये कंगना पहिल्या आठवड्यातील स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आढावा घेते. यावेळी तिच्यासोबत फराह खान आणि रितेश देशमुखसुद्धा उपस्थित असतात. लॉकअपमध्ये असलेल्या स्पर्धकांशी बोलताना कंगना राम कपूरला स्पष्ट म्हणते की, त्याने टास्क आणि स्पर्धेत कोणतेच विशेष प्रयत्न केले नाहीत. “राम, तुला गांभीर्याने खेळ खेळायचा नव्हता आणि जर तुला वाटत असेल की तू या लॉक अपसाठी खूपच मोठा स्टार आहेस, तर मग तू आलाच कशासाठी, फक्त अशा प्रकारे उद्धटपणे वागण्यासाठी?”, असा संतप्त सवाल ती करते.

पहा प्रोमो-

कंगनाला राम कपूर पुढे उत्तर देतो, “जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मीसुद्धा माझं सत्य स्वीकारेन आणि तेही इथल्या कोणाहीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे.” त्यावर कंगना त्याला म्हणते, “जर तुला स्वत:मध्ये सुधारणा करायची असेल तर स्वत:चा बचाव करू नकोस.” ‘लॉक अप 2’मध्ये सहभागी झाल्यापासून राम कपूर सतत त्याच्या वक्तव्यांमुळे आणि वागण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याआधी त्याच्यावर सहस्पर्धक आकांक्षा चमोलासोबतच्या चर्चेदरम्यान व्यभिचाराचं समर्थन केल्याबद्दल खूप टीका झाली होती. इतकंच नव्हे तर इन्फ्लुएन्सर वरुण उर्फ लैला यादवला बळजबरीने शोमध्ये किस केल्याबद्दलही तो चर्चेत आला होता. राम कपूरच्या एकंदर वागण्यावरून नेटकरी त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. आता कंगनानेही त्याची शाळा घेतली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *