Last Updated:
दर्शन करून परतत असताना जांभळे गावाच्या ब्रिजवर सामोरं अचानक खड्डा आला. त्यामुळे बाईकचा अर्जंट ब्रेक मारला.
बदलापूर : मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये एका ११ वर्षांच्या शाळकरी मुलाचा झाड कोसळून मृत्यू झाला, त्यानंतर साकिनाका भागामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता बदलापूरमध्ये एका महिलेचा खड्ड्याने बळी घेतल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात खड्ड्यानं एका महिलेचा बळी घेतला आहे. अरुणा कुलकर्णी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. अरुणा कुलकर्णी या आपल्या मुलासोबत बाईकवरून टिटवाळ्याला गणपती दर्शनासाठी गेल्या होत्या.
दर्शन करून परतत असताना जांभळे गावाच्या ब्रिजवर सामोरं अचानक खड्डा आला. त्यामुळे बाईकचा अर्जंट ब्रेक मारला. मात्र यावेळी तोल गेल्याने अरुणा या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला या अपघातात गंभीर दुखापत झाली.
अरुणा कुलकर्णी यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पावसामध्ये साचलेल्या पाण्यात मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहे. मुंब्रा भागामध्ये साचलेल्या पाण्यात करंट लागून अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील ‘यास्मिन पार्क’ इमारतीबाहेर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली . आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला असं १७ वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. काही कामानिमित्त इमारतीबाहेर पडली असता साचेलल्या पाण्यात विजेता कंरट आल्याने आलीयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. खाजगी कंपणीच्या निष्काळजीपणामुळेच अल्पवयीन मुलीचा जीव गेल्याचा एमआयएम नगरसेवक शोएब डोंगरे यांचा थेट आरोप केला आहे . या प्रकरणी पोलिसांंनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 03, 2026 12:02 AM IST
Badlapur: भय इथले संपत नाही! मॅनहोलनंतर खड्ड्याने घेतला महिलेचा बळी, शहरात संतापाची लाट
