Mumbai : मालाड आणि बोरिवली हत्या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकलमधून प्रवास करताना धारदार हत्यारे किंवा औजारे सोबत नेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कामासाठी धारदार औजारे वापरणाऱ्यांनी ती कामाच्या ठिकाणीच ठेवावीत असं आवाहन मुंबई रेल्वे पोलिसांनी केलं आहे. मासळी विक्रेते, बिगारी कामगार आणि इतर काही व्यावसायिकांकडे धारदार औजारे असतात. मात्र, अशी औजारे लोकल प्रवासादरम्यान सोबत न बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार काही प्रमाणात सवलत देण्याबाबत विचार सुरु आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे रेल्वे पोलिसांचे सांगितले आहे. मासळी विक्रेते, बिगारी कामगार आणि इतर काही व्यावसायिकांकडे धारदार औजारे असतात. ही अवजारे सोबत न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅग चेकिंग होणार
दरम्यान, मालाड आणि बोरिवली हत्या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅग चेकिंग होणार आहे. एकाच वेळी दहा पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ स्टेशनवर उपस्थित राहणार आहे. दोन कर्मचारी बॅग चेक करणार आहेत. टर्मिनलवर लगेज तपासणसाठी मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे पोलीस अधिक सतर्क राहणार आहेत.
लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय तरूणाची हत्या
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल आता जीवघेणी ठरत असल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. पावसाचं पाणी आत येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला. या वादात आरोपीने एका तरूणावर चाकू हल्ला केला. अंधेरी ते बोरिवली जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. मयंक लोहार असं मृत तरूणाचे नाव आहे. मयंक हा विरारचा रहिवासी होता. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या 22 वर्षीय तरूणाच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतक्या विकोपाला गेला की धावत्या लोकलमध्ये चाकू भोसकून मयंक लोहार या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. जोगेश्वरी ते मालाड या स्टेशनदरम्यान ही घटना घडली. या संपूर्ण प्रकाराने रेल्वेतील इतर प्रवासी भयभीत झाले. घटनेतील व्हिडिओत आरोपीच्या हातात चाकू स्पष्टपणे दिसून येत आहे. एवढ्या गर्दीत एका प्रवाशाची चाकू भोसकून हत्या केली जाते यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग