Last Updated:
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम शैलेश लोढा यांचा लेकीचं नुकतंच लग्न झालं. लग्नातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील अनेक कलाकारा मालिका सोडून गेले. मात्र त्यांनी प्रेक्षकांच्या मनात तयार केलेली जागा आजवर कोणीही बदलू शकलेलं नाही. ‘तारक मेहता’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते शैलेश लोढा आता मालिकेचा भाग नाहीत. पण तारक मेहता म्हटलं की त्यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो. मालिकेत तारक मेहतांना मुलं नव्हती. पण खऱ्या आयुष्यात मात्र शैलेश लोढा यांना मोठी मुलगी असून तीचं नुकतंच लग्न झालं. लाडक्या लेकीच्या लग्नात शैलेश लोढा दणकून नाचलेत.
शैलेश लोढा यांची मुलगी स्वरा हिचं नुकतंच लग्न झालं. अत्यंत कमी लोकांमध्ये तिचा लग्नसोहळा पार पडला. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शैलेश लोढा यांच्या आनंदाचा ओसंडून वाहताना दिसत आहे.
स्वराचं लग्न मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालं. लग्न अत्यंत खासगी ठेवण्यात आलं होतं. लग्नातील काही खास क्षण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये शैलेश लोढा स्वतः गाणी गाताना आणि कुटुंबीयांसोबत मनसोक्त नाचताना दिसत आहेत. मुलीच्या लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत असल्याचे चाहत्यांनीही नमूद केले.
या लग्नसोहळ्यात कैफी आणि हमजा शबरी यांनी विशेष परफॉर्मन्स केला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नातील काही व्हिडिओ शेअर केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.शैलेश लोढा यांच्या मुलीच्या लग्नाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र यात कुठेच जेठालाल म्हणजे दिलीप जोशी कुठे न दिसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
शैलेश लोढा यांची मुलगी स्वरा मनोरंजन क्षेत्रापासून फार दूर आहे. ती एक प्रोफेशनल लेखिका आहे. स्वराने तिची आई डॉ. स्वाती लोढा यांच्यासोबत 54 Reasons Why Parents Suck! हे पुस्तकही लिहिले आहे. लेखन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख करत आहे.
शैलेश लोढा आता ‘तारक मेहता’ मालिकेचा भाग नाहीत. त्यांनी 2022 मध्येच मालिका सोडली. तब्बल 14 वर्षे ते मालिकेत ‘तारक मेहतां’ची भूमिका साकारत आहेत. शैलेश लोढा यांच्यानंतर अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहता हे पात्र साकारत आहे.
Mumbai,Maharashtra
