आठवड्यात धमाका करणारी 5 गाणी, सुपरहिट गाण्याने ‘शरारत’ला टाकलं मागे, लिस्टमध्ये कोणतं गाणं अव्वल स्थानी? – Marathi News | Bandhu 2 point 0 Gahra Hua Mashooka Shararat Ucha Lamba Kad Forever these five blockbuster song of the week


सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतात, बॉक्स ऑफिसवर कमाई करतात, त्यानंतर दुसरा सिनेमा प्रदर्शित होतो. पण गाण्याबद्दल असं होत नाही. एक गाणं हिट झालं की, ते लवकर विसरणं कठीण असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सिनेमातील बजेटचा सर्वात मोठा भाग हा गाण्यासाठी खर्च केला जातो… ज्यामुळे नव्या सिनेमांसह नवीन गाणी देखील हीट होतात. जर तुम्हाला संगीताची आवड असेल, तर या आठवड्यातील लोकप्रिय गाण्यांची यादी समोर आली आहे. यात सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे. सिनेमात ‘धुरंधर’ सिनेमातील गाजलेलं गाणं ‘शरारत’ देखील आहे. पण या गाण्याला नव्या सिनेमातील हिट गाण्याने मागे टाकलं आहे. सांगायचं झालं, ‘ओरमॅक्स मीडिया’ने (Ormax Media) या आठवड्यातील लोकप्रिय गाण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या गाण्यांना चाहत्यांकडून सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

टॉप 5 मधील हिट गाणी…

या आठवड्यातील हिट गाण्यांच्या यादीच पहिल्या स्थानावर ‘कॉकटेल 2’ सिनेमातील ‘बंधू 2.0’ हे गाणं आहे. शाहिद कपूर, कृती सनॉन आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेल्या सिनेमातील हे गाणं कविता सेठ आणि नीरज श्रीधर यांनी गायलं आहे. या गाण्याला प्रीतमने संगीत दिलं असून, याचे बोल इरशाद कामिल यांनी लिहिले आहेत.

धुरंधर सिनेमातील गाण्यांची लोकप्रियता आजही कायम…

‘धुरंधर’ सिनेमात अभिता रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘गहरा हुआ’ (Gahra Hua) गाणं दुसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या स्थानावर ‘शरारत’ (Shararat) हे गाणं आहे. तर ‘कॉकटेल 2’ सिनेमातील ‘माशूका’ (Mashooka) हे गाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे; हे गाणे इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय ठरले असून त्यावर मोठ्या संख्येने ‘रील्स’ (Reels) बनवले गेले आहेत.

टॉप 5 मध्ये अभिनेता अक्षय कुमार यांचं देखील गाणं आहे…

अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘वेलकम टू जंगल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठे इतिहास रचच आहे. सिनेमातील ‘ऊंचा लंबा कद फोरेवर’ गाणं हिट ठरलं आहे, हे गाण टॉप 5 गाण्यांच्या यादीच पाचव्या स्थानावर आहे… हे गाणे अक्षयच्या 2007 मध्य प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ (Welcome) सिनेमातील एका गाण्याचे रीक्रिएशन आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *