Shukra Gochar 2026 : शुक्र-केतूच्या संयोगाने 4 राशींचं नशीब पालटणार; 4 जुलैपासून धनसंपत्तीत होणार भरभराट, श्रीमंतीत जगतील राशी


Shukra Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला (Shukra Gochar) सुख, शांती , वैभव, प्रेम, सुंदरता तसेच, भौतिक सुखाचा कारक ग्रह मानतात. जेव्हा शुक्र आपलं नक्षत्र बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहायला मिळतो. त्यानुसार, येत्या 4 जुलै 2026 रोजी शुक्र ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन दोन्ही एकत्र करणार आहे. या दरम्या शुक्राचं केतूसह संयोग जुळून येणार आहे. हा काळ काही राशींसाठी शुभकारक मानला जातो. 

पंचांगानुसार, 4 जुलै रोजी शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत केतू आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान शुक्र आणि केतूची युती होणार आहे. त्याचबरोबर, शुक्र ग्रह अश्लेषा नक्षत्रातून मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मघा नक्षत्राचा स्वामी केतू आहे. त्यामुळे शुक्र केतूच्या प्रभावात येणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. ग्रहांच्या संक्रमणाचा या राशींवर शुभ परिणाम होणार आहे.  तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र-केतीचा संयोग आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. या कालावधीत तुम्ही नवीन योजनांचा लाभ घ्याल. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा कालावधी चांगला आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रह तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. शुक्राच्या संक्रमणाने या राशीवर शुभ परिणाम होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. तसेच, जर तुम्हाला नोकरी बदलीचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी शुभकारक ठरु शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. आर्थिक बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. घरातील वातावरण सुखकारक आणि शांतीचं असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Shani Nakshatra Parivartan 2026 : आज शनिचं नक्षत्र परिवर्तन…! शनिच्या संक्रमणाने सर्व 12 राशींवर नेमका कसा होणार परिणाम? वाचा ज्योतिषशास्त्र



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *