kangana Ranaut on Ram Kapoor: विवाहबाह्य संबंधावर बरळला, 25 वर्षांनी लहान इन्फ्लूएन्सरला लीप टू लीप किस; राम कपूरवर कंगना रनौत भडकली; Video


kangana Ranaut on Ram Kapoor: ‘बडे अच्छे लगते है ‘ फेम अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. 51 वर्षांच्या या अभिनेत्याने 25 वर्षांनी लहान असलेल्या इन्फ्लूएन्सरला लीप टू लीप किस केलं. फराह खान आणि रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या ‘ लॉक अप सीजन 2’ (Lock Up Season 2) मध्ये राम कपूरने केलेल्या या प्रकारामुळे मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.  एवढेच नाही तर गँगरेपसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आधी विनोद केला, नंतर विवाहबाह्य संबंधांवरून केलेल्या वादग्रस्त विधानांमुळेही तो अडचणीत येताना दिसत आहे. सोशल मीडियावर राम कपूरचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. लॉकअप सीझनच्या अलीकडेच झालेल्या एका एपिसोड मध्ये अभिनेत्री कंगना रनौतने हजेरी लावली होती. तिनेही राम कपूरला चांगलंच सुनावलं.  

काय म्हणाली कंगना रनौत?

‘लॉक अप 2 ‘ च्या अलीकडचाच एपिसोड मध्ये आलेल्या कंगनाने राम कपूरला त्याच्या वागण्यावरून चांगलंच धारेवर धरलं. ती म्हणाली ‘ रामजी, तुम्ही या खेळाला एवढा गांभीर्याने घ्यायला नको होतं.तुम्हाला जर असं वाटत होतं की, तुम्ही या लॉकअपसाठी फार मोठे कलाकार आहात, तर तुम्ही इकडे आलातच कशाला? तुमचा असाभ्य आणि उथळपणा दाखवायला का? असं कंगना म्हणाली. यावर रामने सावरासावर करताना म्हटलं ‘ जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा माझा खरेपणा सर्वांसमोर आणेन आणि चांगल्या प्रकारे दाखवेल ‘ कंगनाने यावरूनही राम कपूरला सुनावलं. ती म्हणाली ‘जर सुधारायचं असेल तर स्वतःचा बचाव करणे बंद कर ‘ 

याआधी राम कपूर आणि फराह खानचाही वाद झाला होता. फराहनं राम कपूरला म्हटलेलं की ‘प्रत्येक शोमध्ये तू लीड रोलमध्ये दिसतोस पण इथे येऊन तो बॅकग्राऊंड अभिनेता बनला आहेस. मी जो राम पाहतेय तुम्हाला अजिबात आवडत नाहीये.हे सगळं तू गमतीत घेऊ नकोस’ असं फराहने म्हटल्यानंतर राम म्हणतो ‘माझ्यासाठी तरी गंमतच आहे. मी जसा आहे तसाच राहणार’

राम कपूरने ओलांडली मर्यादा?

‘लॉकअप’च्या मागील भागात काही स्पर्धक गार्डन एरियामध्ये बसून गप्पा मारत होते. त्यावेळी राम कपूरने आपल्या शेजारी बसलेल्या लैलाला मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. मात्र तो तिथेच थांबला नाही. त्यानंतर त्याने लैलाला लिप-टू-लिप किस केल्याचंही दिसलं.राम कपूरने खरंच लिप किस केलं की फक्त तसं दाखवलं, हे स्पष्ट नाही. पण कॅमेऱ्यात दिसलेल्या दृश्यांमुळे त्याने प्रत्यक्ष किस केल्याचाच अंदाज व्यक्त केला जात आहे. राम कपूरचा हा अवतार पाहून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील चकित झाली. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. 

हेही वाचा:

Ram Kapoor Trolling: 52 वर्षीय राम कपूरनं ओलांडल्या सगळ्या मर्यादा; स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएंसरला जबरदस्ती लीप किस; नेटकऱ्यांचा संताप

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *