Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूला ब्रेक; 15 वर्षांच्या पोराच्या लेट एन्ट्रीवर सुनील गावसकर संतापले; व्यक्त केली मोठी भीती, नेमकं काय म्हणाले?


Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 1st T20 : आयपीएल 2026 मध्ये दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वैभवला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र संघात निवड होऊनही पदार्पणाची संधी न मिळाल्याने चर्चा रंगल्या आहेत. वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता होती. इंग्लंडविरुद्ध 1 जुलै रोजी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय संघाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.

पदार्पण उशिरा झाल्याने दबाव वाढेल (Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi)

सोनी स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, वैभवला जितका उशिरा पदार्पणाची संधी मिळेल, तितक्या अधिक अपेक्षा त्याच्यावर वाढतील. त्यांनी म्हटले, “वैभवला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्याच्यावर आधीपेक्षा अधिक दबाव असेल. 15 वर्षांचा खेळाडू दबावाचा फार विचार करत नाही, पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात संधी मिळाल्यास लगेच स्वतःला सिद्ध करावे लागेल, याची त्याला जाणीव नक्कीच असेल.”

गावसकरांच्या मते, तरुण खेळाडूंना संधी मिळण्यास विलंब झाला की त्यांच्या प्रत्येक डावाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण होतात. त्यामुळे पहिल्याच सामन्यात प्रभावी खेळी करण्याचे अतिरिक्त ओझे त्यांच्या खांद्यावर येते.

आयपीएल 2026 चा सर्वात मोठा स्टार(Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 1st T20)

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने 16 डावांत तब्बल 776 धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर (MVP)’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याच शानदार कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

गावसकरांनी आधीच दिला होता सल्ला

विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20पूर्वीच सुनील गावसकर यांनी भारतीय टीम मॅनेजमेंटला वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मते, इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अशा युवा फलंदाजाला खेळवणे हा विरोधी संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो. त्यांनी वैभवला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याची सूचनाही केली होती, तर नियमित सलामीवीरांची जोडी कायम ठेवावी, असे मत व्यक्त केले होते.

आता सर्वांचे लक्ष पुढील सामन्याकडे

पहिल्या सामन्यात संधी न मिळाल्यामुळे वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण आणखी पुढे ढकलले गेले आहे. मात्र त्याच्या आयपीएलमधील कामगिरी आणि प्रतिभा पाहता भारतीय संघ व्यवस्थापन त्याला लवकरच संधी देईल, अशी अपेक्षा आहे. आता चाहत्यांचे लक्ष पुढील टी-20 सामन्याकडे लागले असून, वैभवला अखेर ‘टीम इंडिया’ची ब्ल्यू जर्सी घालून मैदानात उतरण्याची संधी कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे ही वाचा –

Ind vs Eng 1st T20 : काय करतोयस यार…! ईशान किशनच्या ‘त्या’ एका चुकीवर भर मैदानात अभिषेक शर्मा भडकला; स्टम्प माईकमध्ये सगळं काही झालं रेकॉर्ड, पाहा Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *