Guess Who : 20 वर्षांआधी सचिन पिळगांवकरांच्या फिल्ममधून झालेली फेमस, आज TV ची नंबर 1 नायिका; फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं का? अभिनेत्री घराघरात लोकप्रिय आहे. 20 वर्षांआधी सचिन पिळगांवकरांच्या सिनेमात झळकली होती.

News18
News18

सोशल मीडियावर कलाकारांचे जुने फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. अनेकदा या फोटोंमधील कलाकारांना ओळखणं चाहत्यांसमोर चॅलेंजच असतं. सध्या अशाच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा फोटो पाहून अनेकांना ती अभिनेत्री ओळखता आलेली नाही.  आज ती मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही अभिनेत्री 20 वर्षांआधी आलेल्या सचिन पिळगांवकरांच्या सिनेमात दिसली होती. अभिनेत्रीची भूमिका छोटी होती मात्र ती आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. अशोक सराफांसोबत तिची केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अनेक वर्षांनी ही अभिनेत्री टेलिव्हिजनवर आली आणि एकाच रात्री हिट झाली.

फोटोतील ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मधुराणी प्रभुलकर आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारत मधुराणीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. या मालिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली. अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत तिने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि मराठी टेलिव्हिजनची आघाडीची नायिका बनली.

‘आई कुठे काय करते’मधील अरुंधती म्हणून प्रसिद्ध होण्याच्या खूप आधी मधुराणीने चित्रपटात काम केलं होतं. जवळपास 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगांवकर यांच्या गाजलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात तिने एक छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती.

या चित्रपटात मधुराणी रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटातील एका मजेशीर प्रसंगात ती बसमध्ये प्रवास करताना दिसते. कंडक्टरची भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांच्या शेजारील सीट तिला मिळते. यावेळी ती कंगव्यालाच माईक समजून रेडिओ शोचं विनोदी सूत्रसंचालन करत असल्याचा अभिनय करते. तिचा हा छोटासा सीन प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.

मधुराणीनं तिच्या सोशल मीडियावर तिचा हा जुना फोटो शेअर केला आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलंय, “घर आवरताना… सापडतं आपलं….असं काहीतरी… !! जुन्या आठवणी… आडातून वर याव्या तसं … हरखून जातं मन….. आता कितीही शोधलं तरी… ही मी सापडणारच नाही कुणालाही… अगदी मलाही…!”

मराठी बातम्या/मनोरंजन/

Guess Who : 20 वर्षांआधी सचिन पिळगांवकरांच्या फिल्ममधून झालेली फेमस, आज TV ची नंबर 1 नायिका; फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *