Toxic Teaser: ‘डिओड्रंटची जाहिरात…’ ‘टॉक्सिक’चा नवा टीझर पाहून भडकले फॅन्स, अश्लीलता पाहून झाप-झाप-झापलं | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Toxic Teaser Controversy: KGF फेम साऊथ स्टार यश गेल्या काही महिन्यांपासून त्याची आगामी फिल्म टॉक्सिकमुळे तुफान चर्चेत आहे. आज या फिल्मचा नवा टीझर रिलीज झाला आणि प्रेक्षकांना धक्काच बसला.

News18
News18

मुंबई: KGF फेम साऊथ स्टार यश गेल्या काही महिन्यांपासून त्याची आगामी फिल्म टॉक्सिकमुळे तुफान चर्चेत आहे. आज या फिल्मचा नवा टीझर रिलीज झाला आणि प्रेक्षकांना धक्काच बसला. या टीझरला ‘लेडीज अँड लेडीज’ असं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या सर्व प्रोमोजमध्ये केवळ यशलाच हायलाईट केल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हीच नाराजी दूर करण्यासाठी मेकर्सनी चित्रपटातील तगडी फीमेल स्टारकास्ट नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांची पहिली झलक दाखवण्यासाठी हा नवा व्हिडिओ शेअर केला. पण, हा टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सचा प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

टॉक्सिकच्या टीझरवर नेटकऱ्यांचा संताप

टीझर रिलीज होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर युजर्सनी मेकर्सची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. या फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेती महिला दिग्दर्शिका गीतू मोहनदास सांभाळत आहेत, यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसेनासा झाला आहे.

टीझरमधील सीन्स आणि डायलॉग्सवर नेटीझन्सनी अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले आहेत. एका युझरने तर या टीझरची तुलना पुरुषांच्या डिओड्रंटच्या कमर्शियलशी केली. तो म्हणाला, “हा चित्रपट आहे की ‘वाईल्ड स्टोन’ची कोणती जाहिरात सुरू आहे?” टीझरच्या शेवटी येणाऱ्या एका इंग्रजी संवादावरही लोकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, अनेकांनी या संपूर्ण प्रोमोला अत्यंत सुमार दर्जाचा ठरवला आहे.

अभिनेत्रींना काही सेकंदाचा फुटेज

टीझरचं नाव ‘लेडीज’ ठेवूनही मुख्य अभिनेत्रींना स्क्रीनवर फक्त काही सेकंदांचाच वेळ मिळाल्यामुळे चाहते नाराज आहेत. या टीझरच्या थंबनेलपासून ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत केवळ यशचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. एका संतापलेल्या चाहत्याने लिहिलं, “कमाल बघा, टीझरमध्ये एकाही अभिनेत्रीला एक शब्दही बोलण्याची परवानगी नाही आणि कोणालाही ५-१० सेकंदांपेक्षा जास्त काळ स्क्रीनवर दाखवलेलं नाही. इथेही दाखवलंय तेच की कशा प्रकारे या सर्व अभिनेत्री यशच्या अवतीभोवती फिरणार आहेत.”

अनेकदा रिलीज डेट बदलल्यानंतर, हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर याच वर्षी २६ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे. मात्र, या नव्या वादामुळे चित्रपटाभोवतीची चर्चा आता भलत्याच वळणावर पोहोचली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

Toxic Teaser: ‘डिओड्रंटची जाहिरात…’ ‘टॉक्सिक’चा नवा टीझर पाहून भडकले फॅन्स, अश्लीलता पाहून झाप-झाप-झापलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *