Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् ‘त्या’ रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा ‘एक होतं माळीण’चा टीझर


Ek Hota Malin Marathi Movie: माळीण (Malin) गाव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) एक गाव. पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करणारे माळीण (Malin) गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी रात्री गाढ झोपी गेले आणि त्याच रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावच त्या पावसात वाहून गेलं. कल्पनाही करता येणार नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. याच सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट येत्या 24 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर (Ek Hota Malin Marathi Movie Teaser) सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण  कोंजे, दत्तात्रय गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शन चे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे व राजु राणे  यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे  अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी व हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कला नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. 

सिनेमाची कथा ही पूर्णतः सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शक राजू राणे यांनी या सिनेमासाठी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन अचूक कथानक मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण हे बदलापूर येथे करण्यात आले असून कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर (Art Director Nitesh Nandgaonkar) यांनी उभा केलेला माळीण गावचा सेट हा विशेष उल्लेखनीय आहे. दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि संगीत ही या चित्रपटाची बलस्थानं असून टीजर पाहताना अंगावर शहारे येतात. अचानक झालेल्या या भयावह परिस्थितीमुळे, काय परिस्थिती त्या लोकांवर ओढवली असेल, अनेकांची भावी जीवनाची स्वप्न ही अवघ्या काही वेळात या घटनेमुळे वाहून गेली याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत.

‘एक होतं माळीण’ मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *