उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. ज्यानंतर मोठा धक्का थेट उद्धव ठाकरे यांना बसला. 6 खासदारांनंतर थेट 1 आमदारानेही एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी थेट सचिन आहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला उपसभापतीची जागा सुटली. ज्यानंतर काही नावांची जोरदार चर्चा रंगताना दिसली. थेट सचिन आहिर यांना संधी देण्यात आली. हा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य ठाकरेंना मोठा धक्का होता. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेतील विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे आणि काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर सुनील शिंदे यांनीही मोठे विधान केले.
बातमी अपडेट होत आहे….