Suspense Thriller: OTT वर येताच 2 तास 21 मिनिटांच्या सस्पेन्स थ्रिलरचा धुमाकूळ; राजा शिवाजी अन् भूत बंगलाही पडला मागे


OTT Action Thriller on Netflix: दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट (OTT Movies) आणि वेब सिरीज ( Web Series) प्रदर्शित होत असतात. अनेक ॲक्शन आणि सस्पेन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटांची आणि वेब सिरीजची सध्या प्रचंड चर्चा होत असताना अवघ्या 18 कोटी रुपयांचा बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने OTT वर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. बॉक्स ऑफिसवर बजेटच्या 190% नफा कमवलेल्या या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर येताच ट्रेंडिंगच्या शर्यतीत पहिल्या नंबरवर गेलाय. काठोकाठ भरलेल्या ॲक्शन आणि सस्पेन्सने या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ओटीटीवर येताच या चित्रपटाने अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ आणि रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला मागे टाकलं आहे.

दोन तास 21 मिनिटांच्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ

28 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या दोन तास 21 मिनिटांच्या या चित्रपटाने ओटीटीवर येताच ट्रेंडिंगची जागा पकडली आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचं नाव ब्लास्ट असं आहे. मूळ तमिळ भाषेतला असलेला हा चित्रपट तुम्हाला हिंदीमध्येही पाहता येईल. या चित्रपटात एका भ्रष्ट कॉर्पोरेट सिंडिकेट शी दोन हात करणाऱ्या मार्शल आर्टिस्टच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 

या कुटुंबाचा कर्ताधर्ता राजाराम हे माजी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षक असतात.आपल्या मुलीला गरजेच्या वेळी स्वतःचं बचाव करता यावा यासाठी तिला मार्शल आर्ट्सचे सगळे डावपेच ते शिकवतात.पण अचानक राजाराम यांच्या सुखी कुटुंबात एक कॉर्पोरेट समूह हस्तक्षेप करतो आणि या कथेला पूर्ण वेगळे वळण लागतं.राजाराम यांची मुलगी आणि पत्नी अनेक शत्रूंना सामोरे जातात .प्रचंड ॲक्शन आणि सस्पेन्स असलेल्या या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर येतात पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान पटकावलं आहे. 

नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग

हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे. राजा शिवाजी हा दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे तर भूत बंगला हा अक्षय कुमारचा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाने धुरंधरचा नंबरही कापला आहे . धुरंधर आता नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टवर चौथ्या क्रमांकावर गेलाय.तर माधुरी दीक्षितचा ‘मा बहन ‘ चित्रपट सहाव्या स्थानी गेला आहे.अवघ्या 18 कोटींचं बजेट असणाऱ्या ब्लास्ट या चित्रपटाने जगभरातून 75.11 कोटी रुपयांचा कलेक्शन केलं.  बजेटच्या 190% कमाई या चित्रपटाने केली.भारतात 60.71 कोटी रुपये एवढं कलेक्शन या चित्रपटाने केलंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *