Salman khan and Aishwarya rai: बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह स्टोरीपैकी (Bollywood Couple) एक म्हणजे सलमान खान ऐश्वर्या रायची अधुरी प्रेम कहाणी. त्यांची लव्ह स्टोरी कुणापासूनही लपलेली नाही. एक असा काळ होता, जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे 2002 साली रिलेशनशिप संपुष्टात आले होते. त्यांच्या ब्रेकअपबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जाहिरात फिल्म निर्माते प्रल्हाद कक्कर ज्यांनी ऐश्वर्या रायसोबत मॉडेलिंगच्या दिवसामध्ये काम केले होते, त्यांनी त्यांच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी अभिनेत्रीच्या कठीण काळात ऐश्वर्याची साथ दिली होती.
विक्की लालवानीच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी सलमान – ऐश्वर्याच्या ब्रेकअपवरही भाष्य केलं आहे. त्यांनी असा खुलासा केला की, ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायचा बॉलिवूड सिनेसृष्टीतून विश्वास उडाला होता. त्याच्या मते, ऐश्वर्याला असं वाटत होतं की, इंडस्ट्रीतील लोक सलमान खानची साथ देतील, ती एकटी पडेल. त्यांनी सलमान – ऐश्वर्याच्या ब्रेकअपच्या निगडीत या मुलाखतीत अनेक खुलासे केले.
ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचा कुणावरुन उडालेला विश्वास? (Salman Khan And Aishwarya rai breakup)
प्रल्हाद कक्करने सांगितलं, ‘कठीण काळात मी ऐश्वर्या रायची साथ दिली होती. मी तिला म्हणालो होतो की, या गोष्टीची काळजी करु नकोस. पण त्यावेळेस ऐश्वर्या इंडस्ट्री बद्दलच बोलत होती. तिला एकाच गोष्टीचं दु:ख होतं की, इंडस्ट्री सलमान खानची साथ देईल, अभिनेत्रीला एकटीला पाडतील. तिला असं फिल झालं की, तिच्यासोबत धोका झाला. दरम्यान, या रिलेशनशिपमधून बाहेर पडणं तिच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरला. सलमान खान खूप रागीट स्वभावाचे होते’, अशी माहिती त्यांनी दिली.
‘ऐश्वर्याला ब्रेकअपचं जास्त दु:ख झालं नाही, इंडस्ट्र्तील अधिकतर लोक तिला सोडून सलमान खानला पाठिंबा देत होते, या गोष्टीचा तिला त्रास झाला. सत्य तिच्या बाजूने होते. सिनइंडस्ट्रीत तिला योग्य वागणूक मिळत नव्हती. तिचा विश्वास उडाला होता. जर तिची चूक असती अन् दुसऱ्या पक्षाची नसती, किंवा दोघांनाही समान वागणूक मिळाली असती, तर गोष्ट वेगळी होती. पण असं काहीच झालं नाही. सगळं काही एकतर्फी होते’, असं प्रल्हाद कक्कर म्हणाले.
प्रल्हाद कक्करने हे देखील स्पष्ट केले की, ऐश्वर्या रायने त्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीच सांगितले नव्हते. ‘तिने माझ्यासोबत काहीच शेअर केले नव्हते. मला ही गोष्ट माहित होते कारण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो. तो (सलमान खान) बिल्डिंगच्या लॉबीमध्ये अक्षरश: गोंधळ घालायचा. भीतींवर डोकं आपटायचा. मला असं वाटतं की, त्यांचे हे नातं अधिकृतरित्या संपुष्टात येण्यापूर्वी आधीच तुटले होते. ‘
महत्त्वाच्या इतर बातम्या:
विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा