Petrol and Diesel Price: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नायरा एनर्जीच्या देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोल आता पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल (Diesel Price) तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. नायरा एनर्जीचे देशभरात 7000 पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त दरात मिळणार आहे. (Fuel Price cut down)
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे भाव कडाडले आहेत. हे युद्ध तुर्तास काहीसे थंडावले आहे. मात्र, हे युद्ध शिगेला पोहोचले असताना खनिज तेलाने प्रतिबॅरल 120 डॉलर्सचा दर गाठला होता. परिणामी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करण्याचा सपाटा लावला होता. आतापर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात एकूण ₹7.50 प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ₹7.60 प्रति लिटरने वाढ केली आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.21 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 97.83 रुपये इतका आहे.
तत्पूर्वी केंद्र सरकारने 1 जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील लागू केलेले सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक वापरासाठीचे पेट्रोल आणि डिझेल रिटेल विक्रेत्यांकडून घेण्यावर निर्बंध होते. डिझेल विक्री प्रति ग्राहक 200 लिटरपर्यंतच अशी मर्यादा लागू करण्यात आली होती. 12 जून रोजी हे निर्बंध लावण्यात आले होते. ब्लॅक मार्केटिंग थांबवण्यासाठी तसेच रिटेल वापरासाठीचे इंधन व्यावसायिक वापरासाठी वळवले जाऊ नये, यादृष्टीने हे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता हे सर्व निर्बंध दूर करण्यात आले आहेत.
Nayara Energy has cut the prices of Diesel and petrol. Petrol prices have been reduced by Rs 5 per litre and Diesel prices have been reduced by Rs 3 per litre. Nayara Energy has over 7,000 retail outlets across the country.
— ANI (@ANI) July 1, 2026
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात 183.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. तर पाच किलोच्या लहान गॅस सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे 19 किलो आणि 5 किलोच्या सिलेंडरची राजधानी दिल्लीलीत किंमत अनुक्रमे 2930 रुपये आणि 808.50 रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारी सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत. (Commercial cylinder rate)
आणखी वाचा
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!