केतनचा व्हिडीओ समोरImage Credit source: social media
चार महिन्यांपूर्वी मुलाचा झालेला साखरपुडा आणि अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं लग्न.. लग्नासाठी उत्साहात जय्यत तयारी सुरू होती. मात्र 18 जूनचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. होणाऱ्या सुनेसह लोहगडावर गेलेला आपला मुलगा, केतन परत येणार नाही याची कोणीही कल्पना जेखील केली नव्हती, मात्र लोहगडावरून पडून त्याचा मृत्यू झाला आणि हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. सगळ्यांच्या चेहेऱ्यावरचं हसू मावळलं आणि शोकाकूल कुटुंबियांनी बंरडा फोडला.
पुण्यातील व्यावासायिक केतन अग्रवाल हत्येने सगळेच हादरले असून याप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. केतनशी लग्न करायचं नव्हतं यामुळेच आपण त्याचा काटा काढल्याचे सियाने कबूल केलं. 18 जूनल रोजी वाढदिवसाच्या सेलिब्रिशेनच्या निमित्ताने सिया ही केतनला लोहगडावर घेऊन गेली. आधी ठरल्याप्रमाणेच तिचा मित्र चेतनही तिथे आला होता. आणि संधि साधून, कोणी आजाबाजूला नाही हे पाहून त्यांनी केतनला खाली ढकललं. 400 फूट खोल दरीत कोसळल्यामुळेच चेतनाच मृत्यू झाला.
याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सिया व चेतनचीही सतत चौकशी सुरू असून हत्येचे मोटिव्ह, त्यांनी प्लान कुठे कसा रचला, याची सर्व माहिती पोलिस शोधत आहेत. सीन रिक्रिएशनसाठी आधी सियाला आणि आज ( बुधवार 1 जुलै) चेतनलाही लोहगडावर नेलं होतं.
चेतनच्या हत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर, पार्टीत कुटुंबियांसह हसत केला डान्स यय
याच दरम्यान आता मृत केतन अग्रवाल याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर आला असून तो व्हायरल झाला आहे. केतन आणि सियाच्या कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडीओ समोर आलेत. 7 मे रोजी एक कौटुंबिक कार्यक्रम पार पडला, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात केतन अग्रवाल, त्याचे आई-वडील, तसेच होणारे सासू-सासरे (सियाचे आई-वडील) आणि कुटुंबीय हे सगळेच गाण्यावर ठेका धरत, आनंदाने नाचताना दिसत आहे. अग्रवाल कुटुंबीय आणि केतन याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याची हत्या करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
केतनला सियाबद्दल होता संशय ?
सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं नमूद केलं होतं की, केतनने अनेकदा सिया आणि चेतनच्या जवळीकीबद्दल चिंता व्यक्त केली होती.सिया नेहमी बोलताना चेतनचे नाव घेते, असं ही तो म्हणाला होता. केतन जेव्हा तिला फोना करायाच सियाचा फोन नेहमी बिझी असायाच. तिच्या वागण्यामुळे त्याला संशय आला होता. मात्र आपण तिची नीट चौकशी केली आहे, असं अग्रवाल कुटुंबियांनी केतनला सांगत आश्वस्त केलं होतं.